ताज्या घडामोडीमुंबई

गोविंदा पथकाचे आम्हीच राजे – प्रताप सरनाईक

प्रताप सरनाईकांच्या संस्कृती प्रतिष्ठानच्या दहीहंडीचा 10 थर लावून विश्वविक्रम

ठाणे : जय जवान गोविंदा पथकाने प्रताप सरनाईकांच्या संस्कृती प्रतिष्ठानच्या दहीहंडीत 10 थर लावून विश्वविक्रम केला. जय जवान पथकाने दिवसभरात हा दुसऱ्यांचा विक्रम केला. विशेष म्हणजे सकाळी प्रताप सरनाईकांनी जय जवान पथकाला टोमणा मारला होता, त्याच सरनाईकांच्या दहीहंडीत जय जवान पथकाने 10 थरांचा विश्वविक्रम केला.

राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती प्रतिष्ठानकडून ठाण्यामध्ये दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं. यामध्ये सकाळी कोकण नगर गोविंदा पथकाने जय जवान पथकाचा विक्रम मोडत 10 थरांचा नवा विक्रम केला. पण अवघ्या काहीच वेळात जय जवानने घाटकोपरमध्ये 10 थरांचा विक्रम केला.

हेही वाचा        :      जयगड सोसायटीमध्ये स्वखर्चाने ३० किलोवॅट सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वयीत!

सरनाईकांचा जय जवान पथकाला टोमणा
कोकण नगर गोविंदा पथकाच्या विक्रमानंतर मंत्री प्रताप सरनाईक यांनी जय जवान पथकाचे नाव न घेता त्यांना टोमणा हाणला होता. काही गोविंदा पथकांना वाटतं आमचा विश्वविक्रम कोणीच मोडणार नाही असं सरनाईक म्हणाले. त्याच सरनाईकांच्या दहीहंडी कार्यक्रमात जय जवानने पुन्हा एकदा 10 थरांचा विक्रम केला.

‘जय जवान’ने करुन दाखवलं
जय जवान पथकाने पहिल्यांदा प्रयत्न केला, पण तो अयशस्वी झाला. त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा प्रयत्न केला आणि दुसऱ्यांदा ते यशस्वी झाले. जय जवान पथकाने एकाच दिवसात दोन वेळा 10 थरांचा विक्रम केला. ‘गोविंदा पथकांचे खरे राजे आम्हीच’ असा दमदार संदेश जय जवान पथकानं या थरारक कामगिरीतून दिला आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा :महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button