Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

एकनाथ शिंदे आज दिल्ली गाठणार? ‘या’ दोन खासदारांच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडण्याची शक्यता

Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकापाठोपाठ एक उद्धव ठाकरे गटाला धक्का देत आहेत. मागील आठवड्यात ‘ऑपरेशन टायगर’ अंतर्गत ठाकरेंच्या 6 खासदारांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला.

त्यानंतर आमदार सचिन अहिर यांनी पुन्हा एकदा ठाकरे गटाला धक्का देत शिंदेसेनेकडून थेट विधानपरिषदेच्या उपसभापती पदासाठी अर्ज दाखल केला. याच दरम्यान, मागील काही दिवसांपासून केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याच्या चर्चा होत आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळ फेरविस्तारामध्ये शिवसेना शिंदे गटाला कॅबिनेट मंत्रीपदासह आणखी एक मंत्रीपद मिळेल अशी चर्चा रंगली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आज (1 जुलै) एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा होणार असल्याची चर्चा आहे. शिवसेनेकडून श्रीकांत शिंदे आणि ओमराजे निंबाळकर मंत्रि‍पदाची शपथ घेणार असल्याची माहिती आहे.

हेही वाचा –  ‘एसटी’च्या तीर्थाटन योजनेत खासगी भागीदारीला हिरवा कंदील! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

श्रीकांत शिंदे हे एकनाथ शिंदे यांचे सुपूत्र आहेत. गेल्या 12 वर्षांपासून ते खासदार आहेत. तसेच ऑपरेशन टायगरमध्ये त्यांची महत्वाची भूमिका होती. पक्ष विस्तारासाठी सतत त्यांचे दौरे सुरु असतात. आता त्यांच्यावर मंत्रि‍पदाची जबाबदारी सोपवली जाईल अशी चर्चा आहे. तरफुटलेल्या खासदारांपैकीही एकाला मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. ओमराजे निंबाळकर यांचे नाव मंत्रि‍पदासाठी आघाडीवर आहे.

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यावर सध्या NEET कथित पेपर लीक वादामुळे राजकीय दबाव आहे. त्यामुळे या फेरबदलात त्यांची मंत्रिमंडळातून सुट्टी होऊ शकते. पेट्रोलियम मंत्री याशिवाय हरदीप सिंह पुरी यांनाही मंत्रिमंडळातून वगळले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर आणि पंतप्रधानांचे माजी प्रधान सचिव शक्तिकांत दास यांना मंत्रिमंडळात महत्त्वाची जबाबदारी दिली जाऊ शकते. आरबीआयचे माजी गव्हर्नर शक्तिकांत दास देशाचे नवे अर्थमंत्री बनू शकतात.

शिंदे गटातील खासदार श्रीकांत शिंदे यांची केंद्रीय मंत्रिमंडळात एन्ट्री होण्याची दाट शक्यता आहे. ‘रामायण’ फेम आणि मेरठचे नवनिर्वाचित खासदार अरुण गोविल यांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button