Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमुंबई

मुंबईकरांना गुड न्यूज! फर्स्ट क्लासच्या तिकीट दरात ५० टक्क्यांची कपात

मुंबई: एसी लोकलच्या तिकीट दरात ५० टक्क्यांनी कपात केल्यानंतर आता रेल्वेने मुंबईकरांना आणखी एक गिफ्ट दिलंय. मुंबई लोकलच्या फर्स्ट क्लासच्या तिकीट दरातही सुमारे ५० टक्क्यांनी कपात करण्यात आली आहे. त्यामुळे आता फर्स्ट क्लासचं तिकीट सर्वसामान्य मुंबईकरांच्या खिशालाही परवडणारं झालं आहे.

मुंबई लोकल ट्रेनच्या फर्स्ट क्लासच्या सिंगल तिकीटात आता ५० टक्क्यांची कपात करण्यात आली आहे. ५० रुपयांचं तिकीट आता २५ रुपयांना मिळणार आहे. मात्र, हा बदल फक्त सिंगल तिकीट दरात करण्यात आला आहे. मासिक पासच्या दरात कुठलाही बदल करण्यात आलेला नाहीये.

मासिक पास हा जुन्याच दराने मिळणार आहे. हा बदल फक्त सिंगल तिकीटात करण्यात आला आहे. हे नवे दर येत्या ५ मेपासून लागू होणार आहेत. याला युटीएस अॅपवरही अपडेट केलं जाईल.

काहीच दिवसांपूर्वी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी एसी लोकलच्या तिकीट दरात ५० टक्क्यांची कपात करण्यात आल्याची घोषणा केली होती. एसी लोकल आणि लोकलच्या फर्स्ट क्लासच्या दरात कपात झाल्याने सर्वसामान्यांना याचा मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button