Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमुंबई

मुख्यमंत्र्यांनी ‘दूध का दूध पानी का पानी’ करावं- अनिल देशमुख

मुंबई – सध्या राज्यात सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांचे प्रकरण गाजत आहे. गृहमंत्री अनिल देशमुखांनी सचिन वाझेंमार्फत पोलीस दलाला 100 कोटी कलेक्शनचं टार्गेट दिलं होतं, असा आरोप परमबीर सिंग यांनी केलाय. यानंतर एकच खळबळ उडाली. या आरोपानंतर विरोधकांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. मात्र आता अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं आहे.

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना 17 मार्च रोजी मुंबई पोलीस आयुक्त पदावरून हटवल्यानंतर त्यांनी माझ्यावर जे आरोप केलेत, त्या आरोपामध्ये काहीही सत्यता नाही. त्यामुळे त्यांनी जे आरोप लावले आहेत, या संपूर्ण प्रकरणाची त्वरीत चौकशी करून दुध का दुध, पानी का पानी करावं, अशी मागणी अनिल देशमुखांनी उद्धव ठाकरेंकडे केली आहे.

वाचा :-महाविकास आघाडीचे नेते घेणार राज्यापालांची भेट

मुख्यमंत्र्यांनी याची चौकशी लावली तर, मी त्याचे स्वागत करीन. सत्यमेव जयते…, असं अनिल देशमुख यांनी या ट्वीटमध्ये नमूद केलं आहे. या संदर्भात 21 मार्च रोजी मुख्यमंत्र्यांना पाठवलेले पत्रही या ट्वीटसोबत देशमुख यांनी जोडलं आहे.गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांसमोर त्यांची बाजू मांडली. माझ्याकडून कोणताही गैरव्यवहार झालेला नाही. मी निर्दोष आहे. माझ्यावरील आरोप धादांत खोटे आहेत, असं अनिल देशमुख यांनी सांगितलं आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button