TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमुंबई
बाधकाम व्यावसायातील वादातून मारहाण
मुंबई : गोवंडी येथे राहणारे तक्रारदार मोहम्मद फारुख शेख (३७) आणि त्यांच्या वडिलांना शुक्रवारी सकाळी १०.३० च्या सुमारास दोघांनी मारहाण आणि शिवीगाळ केली. दोघांनी तक्रारदाराच्या वडिलांवर धारदार शस्त्राने वार केले. याप्रकरणी तक्रारदार शेख याने शिवाजी नगर पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३०७ , ४५२ , ५०६ (२), ५०४, ३४ भा.द.वि.सह कलम ३७ (१) (अ) , १३५ म.पो.का. अन्वये गुन्हा नोंद केला. दरम्यान, दोन्ही आरोपींना अटक केल्याची माहिती शिवाजी नगर पोलिसांनी दिली.





