Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
साकी नाका येथे 3 अनधिकृत बांग्लादेशी नागरिक आणि 2 ऐजंटना बनावट पासपोर्ट प्रकरणी अटक

महाराष्ट्र: मुंबईतील साकी नाका भागात आज 3 अवैध बांगलादेशी स्थलांतरित आणि 2 एजंट पकडले गेले आहेत. “पोलिसांनी येथे बांगलादेशी नागरिकांना पकडलेले आहे. चौकशी अंती दोन एजंटांना अटक केली गेली ज्यांना भारतीय पासपोर्ट सारख्या बनावट सामग्रीसह अटक करण्यात आलेली आहे. अशी माहिती मुंबई पोलिस प्रवक्तेनी दिली आहे.





