लोकल सेवा पुन्हा सुरू करण्याबाबत मध्य रेल्वेकडून स्पष्टिकरण

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर गेले कित्येक महिने लॉकडाऊन आहे..आता काही प्रमाणात लॉकडाऊनचे नियम हे शिथिल करण्यात आले आहेत…त्यात आता गेले 2 महिने ठप्प असलेली मुंबई लोकल पुन्हा सुरू होण्याचा चर्चा सुरूआहेत. मात्र लोकल सेवा पुन्हा सुरू करण्याबाबत कोणतीही सूचना मिळाली नसल्याचं मध्य रेल्वेनं स्पष्ट केलं आहे. मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.
‘उपनगरीय रेल्वे सेवा सुरू करण्याबाबत अनेक अफवा पसरत आहेत. परंतु रेल्वे पुन्हा सुरू करण्याबद्दल आम्हाला कोणत्याही प्रकारचे आदेश मिळालेले नाहीत. त्याबाबतच्या सूचना मिळताच माहिती देण्यात येईल,’ असं ट्विट शिवाजी सुतार यांनी केलं आहे.

लॉकडाऊनपूर्वी मुंबईत रोज ८० लाख लोक रोज प्रवास करायचे. मध्य, पश्चिम आणि हार्बर या तिन्ही मार्गावरून प्रवाशांची ये-जा असायची. मात्र, लोकलच्या गर्दीमुळे कोरोना फैलाव मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता असल्याने लोकल बंद करण्यात आली होती. मात्र, आता अत्यावश्यक सेवेतील कामगारांची ने-आण करण्यासाठी एसटी आणि बसची सेवाही सुरु करण्यात आली..मात्र ही सेवा अपुरी पडत असून बसचा प्रवास वेळ खाऊ असल्याने राज्याने लोकल सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यास सुरवात केलेली आहे…





