Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमुंबई

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आता राज्भरात ‘राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा’

मुंबई । प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आता राज्यभरात संघटनात्मक बांधणीवर भर देण्यात येणार आहे. त्यासाठी प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला जणार आहे. पहिल्या टप्प्यातील १७ दिवसांत सुमारे ३ हजार किलोमीटर प्रसार करीत विदर्भ आणि खानदेशमधील १४ जिल्हे आणि ८२ विधानसभा मतदार संघांचा आढावा घेतला जाणार आहे.

पक्षाचे सर्वेसर्वा तथा खासदार शरद पवार यांचे विचार तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत रुजवण्याचा संकल्प यानिमित्ताने करण्यात आला आहे.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. शिवसेना आणि काँग्रेस सोबत सरकार स्थापन केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश नेतृत्तव आता पक्षवाढीसाठीही प्रयत्न करीत असताना दिसत आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button