breaking-newsमुंबईराष्ट्रिय

मुंबईत काँग्रेसला गतवैभव प्राप्त करून देण्याचे देवरा यांचे लक्ष्य

मुंबई : काँग्रेस पक्षाची स्थापना झालेल्या मुंबईत काँग्रेसला पुन्हा गतवैभव प्राप्त करण्याचे लक्ष्य मुंबई काँग्रेसचे नवनियुक्त अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी ठेवले आहे. मुंबईतील मतदार नक्कीच यंदा काँग्रेसला साथ देतील, असा त्यांना विश्वास आहे.

मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा अधिकृतपणे उद्या देवरा हे स्वीकारणार आहेत. वडील मुरली देवरा यांनी २२ वर्षे मुंबई काँग्रेसचे अध्यक्षपद भूषविले होते. याच पदावर आपली नियुक्ती झाली याचा विशेष आनंद असल्याचेही देवरा यांनी सांगितले. मुंबई काँग्रेसच्या मुख्यालयात पक्षाच्या विविध नेत्यांच्या उपस्थितीत उद्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. देवरा यांनी नवी दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेऊन चर्चा केली.

१९९८, १९९९, २००४ आणि २००९च्या लोकसभा निवडणुकांमध्ये मुंबईने काँग्रेसला साथ दिली होती. २०१४ मध्ये मुंबईत काँग्रेसचा दारुण पराभव झाला होता. या पाश्र्वभूमीवर यंदा पाटी कोरी राहणार नाही याची खबरदारी देवरा यांना घ्यावी लागणार आहे. मुंबई काँग्रेस गटबाजीने दुभंगलेला आहे. गटबाजी रोखून  नेत्यांना एकत्र आणण्याचे मोठे आव्हान देवरा यांच्यापुढे असेल. याबरोबरच दक्षिण मुंबई मतदारसंघातून विजय मिळविण्यासाठी त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button