Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

बैठ जाओ चचा! स्वरा भास्करची वारिस पठाण यांच्यावर टीका

मुंबई |महाईन्यूज|

‘ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुसलमीन’ (AIMIM) या पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि माजी आमदार वारिस पठाण यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद पाहायला मिळत आहेत. ‘१५ कोटी आहोत मात्र १०० कोटींवर भारी आहोत हे लक्षात ठेवा’, असं वक्तव्य पठाण यांनी एका सभेत केलं होतं. वादग्रस्त वक्तव्यावरून अनेकांनी त्यांच्यावर टीका केली असून राजकीय घडामोडींवर नेहमीच मत व्यक्त करणारी अभिनेत्री स्वरा भास्कर हिनं देखील ट्विट करत पठाण यांच्यावर टीका केली आहे.

‘काका शांत बसा! कोणाची मदत करु शकत नसाल तर किमान शांत राहत जा. अशा प्रकारची अनावश्यक विधानं, बडबड करु नका. तुमच्या अशा बेताल अशा वक्तव्यांमुळं चळवळींच नुकसान होतं’, असं ट्विट करत स्वरानं पठाण यांच्यावर निशाणा साधला आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button