Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

पत्नीला मिठी मारून लोकलमधून फेकले, हार्बर रेल्वेवरची घटना

मुंबई – धावत्या लोकल ट्रेनमधून पत्नीला ढकलून दिल्याची घटना मुंबईत घडली आहे. या घटनेत संबंधित महिलेचा मृत्यू झाला आहे. आरोपीने आधी धावत्या लोकल ट्रेनमध्ये पत्नीला मिठी मारली आणि मग तिला ट्रेनमधून ढकलून दिलं. लोकलच्या हार्बर मार्गावरील चेंबूर आणि गोवंडी रेल्वे स्थानकादरम्यान हा प्रकार घडला. या प्रकरणी वडाळा लोहमार्ग पोलिसांनी महिलेचा पती अनवर अली शेखला बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान त्याने हे कृत्य का केलं हे अद्याप समजू शकलेलं नाही.

दीडच महिन्यांपूर्वी अनवरचा पूनम चव्हाण हिच्याशी विवाह झाला होता. हे दोघेही बेरोजगार होते. हे दोघे सोमवारी (11 जानेवारी) मस्जिद बंदरवरुन आपल्या नातेवाईकांना भेटून पुन्हा मानखुर्दला लोकल ट्रेनमधून येत होते. यावेळी अनवरने आधी पूनमला मिठी मारली आणि नंतर चेंबूर स्थानक सोडल्यावर भरधाव लोकलमधून तिला रुळावर ढकलून दिले

ही घटना लोकलमध्ये असलेल्या संगीता भालेराव या महिलेने पाहिली आणि त्यांनी तात्काळ गोवंडी रेल्वे स्थानकात असलेल्या पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी रेल्वे स्थानकातच अनवरला ताब्यात घेतले आणि रेल्वे रुळावर शोध घेतला असता त्याची पत्नी चेंबूर रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर मृत अवस्थेत आढळून आली.

या प्रकरणी वडाळा लोहमार्ग पोलिसांनी अनवरविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. दारुच्या नशेत ही त्याने आपल्या पत्नीची हत्या केली असा अंदाज पोलिसांना असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button