ड्रग्ज प्रकरणी करण सजनानीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
मुंबई – ड्रग्स प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी)कडून अटक झाल्यानंतर दीया मिर्झाची माजी मॅनेजर आणि व्यावसायिक करण सजनानी यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. मुंबईच्या एस्प्लेनेट न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. त्यानुसार 30 जानेवारीपर्यंत दोघांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात येणार आहे.
वाचा :-धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी उद्यापासून राज्यभरात आंदोलन
एनसीबीच्या मुंबई युनिटने काही दिवसांपूर्वी मुंबईच्या तीन भागात छापा मारला होता. या छाप्यात सुमारे 200 किलो गांजा जप्त करण्यात आला. तसेच दोन महिला आणि एका ब्रिटीश नागरिकाला अटक करण्यात आली होती. अटक केलेल्या आरोपींमध्ये बॉलिवूडची माजी मॅनेजर राहीला फर्निचरवाला, शाहिस्ता फर्निचरवाला आणि करण सजनानी या ब्रिटिश नागरिकाचा समावेश आहे.
दरम्यान, एनसीबीच्या चौकशीदरम्यान सजनानीने तो कोणाला ड्रग्ज पुरवत होता याबाबत माहिती दिली होती. यावेळी त्याने मुच्छड पानवाल्याचेही नाव घेतले होते. यानंतर एनसीबीच्या पथकाने कॅम्स कॉर्नरमधील त्याच्या दुकानात छापा टाकला, तेथून काही अंमली पदार्थांची सामग्री मिळाली होती.





