Breaking-newsमुंबई

कोरोना संकटाबरोबर मुंबईत पावसाळ्याआधीच डेंग्यू, मलेरियाचा धोका

मुंबई : शहरात कोरोना बाधितांचा आकडा वाढत आहे. कोरोनाविरोधात आरोग्य यंत्रणा आणि राज्यसराकरची सुरु आहे. कोरोनाचे संकट कायम असताना आता मुंबईला डेंग्यू आणि मलेरियाचा धोका पोहोचला आहे. मुंबईत पावसाळ्याआधीच डेंग्यू मलेरियाचा धोका वाढल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेची डोकेदुखीत अधिक भर पडलेली दिसून येत आहे.

मुंबई महापालिकेच्या मान्सूनपूर्व सर्वेक्षणात १४५० ठिकाणी डेंग्यू आणि मलेरियाच्या डासांची पैदास झाल्याचे पुढे आले आहे. त्यापैकी ११४६ ठिकाणी डेंग्यूचे तर ३३३ ठिकाणी मलेरियाच्या डासांची अंडी सापडली आहेत. त्यामुळे मुंबई पालिका अधिक सतर्क झाली आहे. बीएमसीचे १५०० कर्मचारी डेंग्यू आणि मलेरिया पैदास रोखण्यासाठी गेले काही दिवस सातत्याने शहरात निर्जंतुकीकरणाची मोहीम राबवत आहे. 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button