breaking-newsTOP Newsमुंबई

कोरोनातून कसेबसे सावरताना मुंबईवर आता नवीन आजाराचं संकट

मुंबई – कोरोनातून कसेबसे सावरत असताना आता मुंबईवर आणखी एक संकट आले आहे. मुंबईत मलेरियाची साथ पसरली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मुंबईत मलेरियाचे रुग्ण अधिक सापडल्याने आरोग्य यंत्रणेचे धाबे दणाणले आहेत.

मुंबईत गेल्या वर्षी जुलै महिन्यात 438 मलेरियाचे रुग्ण सापडले होते. यंदा ही संख्या दुप्पट झाली आहे. यंदा जुलै महिन्यात मलेरियाचे 872 रुग्ण सापडले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे मलेरियामुळे दोघांचा मृत्यू झाला आहे.

जून आणि जुलै महिन्यांमध्ये मलेरियाची रुग्णसंख्या दरवर्षी दुप्पट होत असते. यंदाही जुलैमध्ये मलेरिया रुग्णांचा आकडा दुप्पट झाला आहे. शिवाय कोरोनाचं संकटही पूर्णपणे ओसरलेलं नाही. त्यामुळे मलेरिया रुग्णांची संख्या वाढल्यास रुग्णालयांवर ताण येणार असून उपचारासाठी रुग्णालयात रुग्णांची गर्दी वाढल्यास उपचार विस्कळीत होण्याची शक्यता आहे.

मलेरियापाठोपाठ डेंग्यूचे रुग्णही आढळले आहेत. गेल्यावर्षी जुलैमध्ये मुंबईत डेंग्यूचे 29 रुग्ण सापडले होते. यंदा जुलैमध्ये 11 रुग्ण सापडले आहेत. डेंग्यू रुग्णांची संख्या कमी असली तरी डेंग्यूचेही रुग्ण सापडत असल्याने प्रशासनासमोर मोठं आव्हान निर्माण झालं आहे. त्यामुळे मलेरिया आणि डेंग्यूच्या रुग्णांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून रुग्णालयांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. यासाठी स्वतंत्र कक्षही सुरू करावा लागणार आहे.

मुंबईत गॅस्ट्रोच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. 2019 च्या जुलै महिन्यात गॅस्ट्रोचे 994 रुग्ण होते. त्यात आता केवळ 53 आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button