Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीमहाराष्ट्रराष्ट्रिय

देशात गेल्या 24 तासात 63 हजार 489 नागरिकांना संसर्ग; तर, 944 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

नवी दिल्ली – देशात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. गेल्या 24 तासांमध्ये तब्बल 63 हजार 489 रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 944 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील रुग्णसंख्या 25 लाख 89 हजार 682 वर पोहोचली आहे.

देशात आतापर्यंत 18 लाख 62 हजार 258 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर सध्या देशात 6 लाख 77 हजार 444 रुग्ण उपचार घेत आहेत. यामध्ये दुर्देवाने आतापर्यंत 49 हजार 980 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आयसीएमआरच्या रिपोर्टनुसार 15 ऑगस्टपर्यंत देशभरात 2 कोटी 93 लाख 9 हजार कोरोनाच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. तर काल दिवसभरात 7 लाख 46 हजार कोरोनाच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. भारत कोरोना रुग्णांच्या आकडेवारीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. अव्वल क्रमांकावर अमेरिका, तर दुसऱ्या क्रमांकावर ब्राझिल असून तिसऱ्या क्रमांकावर भारत आहे.

अमेरिकेत सध्या 5 कोटी 52 लाख रुग्णसंख्या आहे. तर ब्राझिलमध्ये 3 कोटी 31 लाख रुग्णसंख्या आहे. जगभरातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 2 कोटी 16 लाख 17 हजारांच्या वर पोहोचला आहे. तर, 1 कोटी 43 लाख 33 हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. जगभरात 7 लाख 79 हजार रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button