अर्णब गोस्वामी विरोधात काँग्रेसचा मोठा निर्णय; प्रत्येक पोलीस ठाण्यात देशद्रोहाचा गुन्हा नोंदवणार
मुंबई |
भारतीय लष्कराच्या कारवाईबाबतची संवेदनशील माहिती अर्णब गोस्वामी यांच्याकडे तीन दिवस आधीच कशी पोहचली? अर्णब आणि पार्थोदास गुप्तासोबत केलेल्या संवादातून बालाकोटच्या लष्करी कारवाई तसेच पुलवामाच्या दहशतवादी हल्ल्याबाबतचादेखील संवाद झाल्याचे समोर आलेले आहे. याविरोधात केंद्र सरकारने काहीच पाऊले न उचलल्याने कांग्रेसने आता मोठा निर्णय घेतलेला आहे.
मुंबईतील काँग्रेस कार्यकर्ते, नेते मुंबईतील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करणार आहेत. तसेच अर्णब यांच्या अटकेची मागणी करणार आहेत. मुंबई काँग्रेसचे नवनियुक्त अध्यक्ष भाई जगताप यांनी शनिवारी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीत ही घोषणा केलेली आहे.
वाचा- हिमाचल प्रदेशमध्ये हिमवृष्टीमुळे लाहौल-स्पीती जिल्ह्यातील सिसू येथे राष्ट्रीय महामार्ग 3 ठप्प





