breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

Ranji Trophy | मुंबईने विक्रमी ४२ व्यांदा रणजी ट्रॉफीचे विजेतेपद जिंकले

Ranji Trophy 2024 Final | मुंबईच्या संघाने विक्रमी ४२ व्यांदा रणजी करंडक आपल्या नावे केला आहे. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वाखालील संघाने या हंगामात अष्टपैलू कामगिरी करत अंतिम सामन्यात विदर्भाचा १६९ धावांनी पराभव केला. मुंबईने दिलेल्या ५३८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना विदर्भाचा संघ ३६८ धावांवर ढेपाळला. विदर्भ संघाचा कर्णधार अक्षय वाडकरची एकाकी झुंज अपयशी ठरली.

नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना मुंबई पहिल्या डावात २२४ धावा केल्या. प्रत्युत्तरात विदर्भ संघाचा डाव १०५ धावांवर गारद झाला. यानंतर दुसऱ्या डावात मुंबईच्या मुशीर खानच्या शतकाच्या आणि श्रेयस अय्यरच्या ९५ धावा आणि कर्णधार अजिंक्य रहाणेच्या ७३ धावांच्या जोरावर सर्वबाद ४१८ धावांचा डोंगर उभारला आणि विदर्भासमोर ५३८ धावांचे लक्ष्य ठेवले.

प्रत्युत्तरात विदर्भकडून सलामीवीर अथर्व तायडे आणि ध्रुव शोरी यांनी त्यांना ६४ धावांची भागीदारी करून दमदार सुरुवात करून देण्याचा प्रयत्न केला पण शम्स मुलाणीने तायडेला बाद करून पहिली विकेट मिळवली. तनुष कोटियनने शोरीला बाद करत लगेचच दुसरी विकेट घेतली. अमन मोखाडे आणि यश राठोडला पायचीत करत त्यांना झटपट माघारी धाडले आणि पाहुण्या संघाने १३३ धावांवर ४ विकेट गमावले होते. करूण नायर चांगल्याच फॉर्मात दिसत होता, विस्फोटक खेळी करत त्याने ७४ धावा केल्या होत्या. पण चौथ्या दिवसाच्या अखेरीस गोलंदाजीला आलेल्या मुशीर खानने नायरला झेलबाद केले.

हेही वाचा     –      ‘CAA कायदा हवा की नको? उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट करावं’; अमित शाह यांचं आव्हान 

पाचव्या आणि शेवटच्या दिवसाचा डाव सुरू झाला तेव्हा विदर्भचा संघ ५ बाद २४८ धावांवर खेळत होता. त्यांना विजयासाठी २९० धावांची तर मुंबईला ५ विकेट्सची गरज होती. अक्षय वाडकर आणि हर्ष दुबेची जोडी मैदानात पाय रोवून उभी होती. वाडकरने रणजी फायनलमधील त्याचे दुसरे शतक पूर्ण केले होते.पण नंतर ९ चौकार आणि १ षटकार लगावत १०२ धावा करणाऱ्या शतकवीराला मुंबईच्या तनुष कोटीयनने शतकी खेळी केलेल्या अक्षय वाडकरला पायचीत करत विदर्भ संघाला मोठा धक्का दिला.

तनुषनंतर तुषार देशपांडेने दुबेला झेलबाद करत विदर्भाच्या आशांवर पाणी फेरले.त्यानंतर आदित्य सरवटेची विकेटही देशपांडेच्या नावे होती. तनुष कोटीयनने षटकार लगावणाऱ्या यश ठाकूरला क्लीन बोल्ड केले. नंतर अजिंक्यने शेवटच्या विकेटची जबाबदारी अनुभवी धवलवर सोपवली आणि त्याने आपल्या शानदार गोलंदाजीने उमेश यादवला क्लीन बोल्ड करत सामना मुंबईच्या नावे केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button