breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

वीजदेयक थकबाकीमुक्तीसाठी शेतकऱ्यांना ३१ मार्चपर्यंत संधी

कराड |

शेतकऱ्यांना कृषिपंपाच्या वीजदेयकांमधून थकबाकीमुक्तीसाठी ५० टक्के सवलतीचा लाभ घेण्यासाठी ३१ मार्चपर्यंत संधी आहे. ‘कृषिपंप वीजजोडणी धोरण २०२०’ मधून मूळ थकबाकीमध्ये ६६ टक्के सवलत देण्यात येत आहे. सातारा जिल्ह्यातील १ लाख ३४ हजार ५५४ शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग घेतला आहे. त्यातील ७० हजार २३४ शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेत वीजदेयक निरंक केले आहे.

दरम्यान, पुढील तीन महिन्यांमध्ये थकबाकीमुळे कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित होणार नाही. या योजनेच्या लाभासाठी आता काही दिवसच उरले आहेत. त्यामुळे थकबाकीदार शेतकऱ्यांना महावितरणकडून वीजदेयकांच्या दुरुस्तीसह सर्व प्रकारचे कार्यालयीन सहकार्य जलदगतीने देण्यात येत आहे. सुधारित थकबाकीच्या रकमेत ५० टक्के सवलत मिळविण्यासाठी ३१ मार्चपूर्वी थकबाकीमुक्ती योजनेत सहभागी व्हावे. चालू वीजदेयक व थकबाकीची ५० टक्के रक्कम भरून वीजदेयक कोरे करावे तसेच कृषी आकस्मिक निधीमधून ग्रामपंचायत क्षेत्र व जिल्हाक्षेत्रातील वीजयंत्रणेच्या विकासकामांना हातभार लावावा, असे आवाहन पुणे प्रादेशिक संचालकांनी केले आहे.

सातारा जिल्ह्यातील १ लाख ८३ हजार ९७३ शेतकऱ्यांकडे एकूण ७७७ कोटी ९५ लाख रुपयांची थकबाकी होती. त्यातील महावितरणकडून निर्लेखन तसेच व्याज व दंड माफी, वीजदेयक दुरुस्तीनंतर समायोजनेतून या शेतकऱ्यांकडे आता ६१९ कोटी ६४ लाख रुपयांची सुधारित थकबाकी आहे. त्यातील ५० टक्के रक्कम भरल्यास उर्वरित ५० टक्के थकबाकी म्हणजे ३०९ कोटी ८२ लाख रुपये माफ होतील.

आतापर्यंत १ लाख ३४ हजार ५५४ शेतकऱ्यांनी थकबाकीमुक्त योजनेत सहभाग घेऊन थकबाकी व चालू वीजदेयकांपोटी २८३ कोटी ९८ लाख रुपयांचा भरणा केला आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना थकबाकीपोटी भरलेल्या रकमेएवढी सूट, महावितरणकडून निर्लेखनद्वारे मिळालेली सूट तसेच विलंब आकार व व्याजातील सूट अशी २०२ कोटी ५२ लाख रुपये माफ झालेत. यामध्ये ७० हजार २३४ शेतकरी वीजदेयकांमधून संपूर्ण थकबाकीमुक्त झालेत. त्यांनी चालू वीजदेयकासह सुधारित थकबाकीची ५० टक्के रक्कम असा एकूण २०१ कोटी ६३ लाख रुपयांचा भरणा केला आहे. सुधारित थकबाकीमध्ये त्यांना आणखी १०७.२० कोटीची सूट व संपूर्ण थकबाकीमुक्ती मिळाली आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button