breaking-newsमहाराष्ट्र

MUMBAI : मेरा चौकीदार चोर है, मनसेकडून मोदींवर टिका

मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील एनडीए सरकारच्या धोरणांवर महाराष्ट्र निवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी वारंवार टीका केली आहे. नोटाबंदी, बुलेट ट्रेन या मुद्द्यांवरुन राज मोदींवर चांगलेच बरसले आहेत. त्यानंतर आता राफेल प्रकरणावरुन मनसेने मोदींना पुन्हा एकदा टार्गेट केले आहे.

राफेल प्रकरणावरुन मुंबईतील मनसेचे माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह महानायक अमिताभ बच्चन यांच्या दीवार सिनेमातील स्टाइलने मोदींवर टीका केली आहे. देशपांडे यांच्यासह मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी आपल्या हातावर ‘मेरा चौकीदार चोर हे’ असे लिहीले असून हा फोटो त्यांनी आपल्या फेसबुकवर पोस्ट केला आहे.

यापूर्वी सातत्याने मोदींवर राज ठाकरेंकडून टीका होत असल्याच्या पार्श्वभूमीवर देशपांडे यांनी मनसेची अधिकृत भुमिकाच या फोटोतून मांडल्याचे दिसते. या फोटोला शेकडो लाइक्स, कमेंट आणि शेअरही मिळाले आहेत. यापूर्वी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राफेल प्रकरणावरुन मोदींवर ‘हमारा चौकदार चोर है’ अशा शब्दांत कठोर टीका केली होती.

तत्पूर्वी, राज ठाकरे यांनी मंगळवारी नवे राजकीय टीकात्मक व्यंगचित्र सोशल मीडियातून प्रसिद्ध केले. यामध्येही त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शाह यांना टार्गेट केले आहे. विशेष म्हणजे गांधी जयंतीच्या पार्श्वभूमीवर ही टीका करण्यात आली आहे. यामध्ये ‘महात्मा गांधी हे चरख्यावर सूत कातायचे व कपडे तयार करायचे. पण नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे जनतेचे कपडे उतरवून त्यातून सूत काढत आहेत’, अशी टीका त्यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button