breaking-newsताज्या घडामोडीपाटी-पुस्तकमहाराष्ट्र

‘MSBSHSE’ 12वीच्या निकालाची तारिख अखेर जाहीर

सीबीएससी आणि आयसीएससी बोर्डाचा बारावीचा निकाल नुकताच लागला. याचसोबत बहुतांश मोठ्या राज्यांचे बारावीचे निकाल जाहीर झाले आहेत. यामुळे आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परिक्षेचा निकाल कधी लागणार याकडे सर्व विद्यार्थ्यांचं आणि परिक्षार्थ्यांचं लक्ष लागलं आहे. त्याबाबतच आता एक मोठी घोषणा करण्यात येणार आहे. महाराष्ट्र बोर्डचा 2020 बारावीचा निकाल २० जुलै २०२० पर्यंत जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती बोर्डाच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.

महाराष्ट्र बोर्डाच्या mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटवर बारावीचा निकाल पाहता येणार आहे. याबाबत नुकतीचं अधिकृत माहिती आता देण्यात आली आहे. गेले अनेक दिवस १२वीच्या विद्यार्थ्यांचं लक्ष या निकालाकडे लागून राहिलं होतं. अखेर बोर्डाने आता निकालाच्या तारखेबाबत स्पष्टता आणल्याने आता निकालाबाबतची धाकधूक अधिक वाढली आहे.

बारावीच्या सर्वच शाखांची परिक्षा 18 फेब्रुवारी ते 18 मार्च यादरम्यान पार पडली. लॉकडाऊनच्या आधी बारवीची परिक्षा जरी संपली असली तरीही लॉकडाऊनमुळे उत्तरपत्रिका तपासणी आणि त्यांचं संकलन यामध्ये बऱ्याच अडचणी आल्या. त्यामुळे मागच्या वर्षी 28 मेला बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला होता. पण यावर्षी लॉकडाऊनमुळे बारावीचा निकाल लागण्याला उशीर झाला आहे.
दरम्यान काल बारावी निकालाच्या लिंकबाबत गोंधळ झाला होता.बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर निकालाची लिंक अॅक्टिव्हेट झाली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम वाढला होता. कारण कोणत्याही तारखेची घोषणा न करता अचानक लिंक अॅक्टिव्हेट झाल्याने गोंधळ निर्माण झाला होता. मात्र नंतर बोर्डाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं की, बारावीचा यंदाचा निकाल अद्याप जाहीर करण्यात आलेला नसून जी लिंक अॅक्टिव्हेट झाली होती ती मागील वर्षीची होती. दरम्यान, आता बोर्डाने तारखेची अधिकृत घोषणा केल्याने याबाबतचा सगळा संभ्रम दूर झाला आहे.

यंदा बारावीची परीक्षा १८ फेब्रुवारी ते १८ मार्च दरम्यान घेण्यात आली होती. मात्र, कोरोना संकटामुळे उत्तरपत्रिका तपासण्यास उशीर झाल्याने यंदा याचा परिणाम थेट निकाल जाहीर करण्यावर झाला आहे. या परीक्षेसाठी जवळजवळ १५ लाखांहून अधिक विद्यार्थी बसले होते.

दरम्यान, दहावीच्या निकालाच्या तारखेबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. पण दहावीचा निकाल हा ३० जुलैपर्यंत जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. मागील वर्षी दहावीचा निकाल हा ८ जून २०१८ रोजी जाहीर झाला होता. तर बारावीचा निकाल हा ३० मे रोजी जाहीर झाला होता. मात्र यंदा कोव्हिड संसर्ग आणि लॉकडाऊन यामुळे उत्तरपत्रिका तपासण्यास आणि गुणपत्रिका तयार करण्यास बराच वेळ लागल्याने निकाल लांबणीवर गेला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button