ताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्र

श्री. चिंतामणी मित्र मंडळातर्फे गणेश जयंतीनिमित्त श्री रामकथा व ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे पारायण

रविवार 4 ते शनिवार 10 फेब्रुवारी 2024 पर्यंत कार्यक्रमाचे आयोजन

पिंपरीः श्री चिंतामणी गणेश मित्र मंडळ व वाल्हेकरवाडी ग्रामस्थ यांच्यावतीने गणेश जयंतीनिमित्त प्राधिकरण आहेरनगर चिंचवड येथे भव्य रामकथा व ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे पारायण आयोजित करण्यात आले आहे. रविवार दिनांक 4 ते शनिवार 10 फेब्रुवारी 2024 पर्यंत हा कार्यक्रमाचे होणार असून, विविध किर्तनकारांची कीर्तन सेवा सायंकाळी 7 ते 10 पर्यंत होणार आहे. जास्तीत जास्त भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

11 फेब्रुवारी रोजी रामकथा प्रवक्ते विदर्भरत्न रामायणाचार्य हभप संजय महाराज पाचपोर (अकोला) यांचे प्रवचन होणार आहे. तर सायंकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत हभप संतोष महाराज पायगुडे (मांडवी, पुणे) यांचे कीर्तन होणार आहे. तर 12 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी 7 ते रात्री 10 वाजेदरम्यान हभप प्रभुराज पुरुषोत्तम पाटील (आळंदीकर) यांचे कीर्तन होईल. 13 फेब्रुवारी सकाळी 10 ते 12 वाजेदरम्यान हभप उद्धव महाराज कोळपकर (चिंचवड) यांचे काल्याचे कीर्तन होईल. तर दुपारी 12 ते सायं. 7 वाजेपर्यंत महाप्रसाद देण्यात य़ेईल. तसेच सायंकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत स्वरेशा पोरे व सहकाऱ्यांचा स्वरनाद प्रस्तुत गीत रामायण कार्यक्रम होणार आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button