ताज्या घडामोडी

आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवडच्या शहराध्यक्षपदी मीनाताई जावळे यांची नियुक्ती

पिंपरी (Pclive7.com):- महाराष्ट्र प्रभारी गोपाल भाई इटालिया व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अजित फाटके यांनी मीनाताई चंद्रमनी जावळे यांच्यावर विश्वास दर्शवून आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवडच्या शहराध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. पिंपरी चिंचवड शहरांमध्ये एका महिलेला प्रथम अध्यक्षपदाचा मान मिळाला याबद्दल यावेळी सर्वांनी आनंद व्यक्त केला आहे.
मीनाताई जावळे ह्या सामाजिक कार्यामध्ये सतत कार्यरत असतात, त्यांनी महिला बचत गटाच्या माध्यमातून संपूर्ण पिंपरी चिंचवडमध्ये मोठे जाळे पसरवले आहे. आकुर्डीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, छ.शिवाजी महाराज जयंतीउत्सव तसेच अनेक उपक्रम मीनाताई राबवत असतात.
आम आदमी पार्टीची सामान्य कार्यकर्ता म्हणून प्रामाणिकपणे काम करताना पिंपरी चिंचवडच्या शहराध्यक्षपदी एका महिलेची संधी देऊन पार्टीने एक नवा पायंडा पाडला आहे. महिला शक्तीच्या जोरावर पिंपरी चिंचवडमध्ये आम आदमी पार्टीचा महापौर निवडून आणू असा विश्वास नवनियुक्त शहराध्यक्ष मीनाताई जावळे यांनी व्यक्त केला आहे. मीनाताई जावळे यांनी यावेळी त्यांच्या झालेल्या नियुक्ती बद्दल गोपाल भाई इटालिया, अजित फाटके आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले आहे.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button