breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रिय

Chinchwad Byelection : नाना काटे यांच्या विजयासाठी आणखी १८ हून अधिक संघटनांचा पाठिंबा

आतापर्यंत मतदारसंघातील ५० हून अधिक संघटना पाठिशी

पिंपरी : चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून मैदानात उतरलेल्या विठ्ठल उर्फ नाना काटे यांना मतदारसंघातील सामाजिक संघटनांचा मोठा पाठिंबा मिळत आहे. दोनच दिवसांपूर्वी चाळीसहून अधिक संघटनांनी नाना काटे यांच्या विजयासाठी पाठिंबा दिल्यानंतर आता आज (दि. २१) तब्बल १८ संघटना काटे यांच्या पाठिशी पूर्ण ताकदीनिशी उतरल्या असून, त्यांनी आपला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे नाना काटे यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाल्याचे मानले जात आहे.

चिंचवड विधानसभेची पोटनिवडणुकीत दिवसेंदिवस रंगत येत आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे आणि भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांच्यात चुरस रंगली आहे. मात्र भाजपने केंद्रातील ९ वर्षांच्या सत्ताकाळात तसेच महापालिकेत असलेल्या पाच वर्षांच्या सत्ताकाळात पिंपरी-चिंचवड शहराला भकास बनवितानाच सर्वसामान्य नागरिकांचे जगणे मुश्किल केले आहे. त्यातच खोक्याच्या जोरावर राज्यात घडविलेले सत्तापरिवर्तन सर्वसामान्य नागरिकांसह सामाजिक कार्य करणाऱ्या संघटनांनाही ते रुचलेले नाही. त्यामुळे चिंचवडची पोटनिवडणूक ही भाजपची भ्रष्ट हुकुमशाही आणि राष्ट्रवादीने शहरात केलेला विकास या मुद्द्यावर लढली जात आहे. भाजपने राज्यघटना, संविधानच अडचणीत आणल्यामुळे लोकशाहीला मानणाऱ्या संघटना, सर्वसामान्यांसाठी काम करणारे अनेक पक्ष नाना काटे यांच्या पाठिशी ठामपणे उभारल्याचे पहावयास मिळत आहे.

‘या’ संघटनांचा मिळाला पाठिंबा

नाना काटे यांना विजयी करण्यासाठी पाठिंबा देणाऱ्यांमध्ये पश्चिम महाराष्ट्र रहिवाशी सोशल फाऊंडेशन, गंगाधर गाडे यांचा पॅथर्स रिपब्लिकन पार्टी, भारतीय लहुजी पँथर, संस्थापक अध्यक्ष संदिपान झोंबाडे, आखिल भारतीय ओबीसी सेवा संघ, असंघटीत कष्टकरी कामगार महासंघ (महाराष्ट्र), युवराज पवार यांची पिंपरी-चिंचवड कामगार संघटना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) राष्ट्रीय अध्यक्ष दीपक निकाळजे, क्रांतीवीर बिरसा मुंडा आदिवासी समाज संघटना, कमला नेहरू माध्यमिक प्राथमिक विद्यालय चिंचवड स्टेशन, सम्राट अशोक सेना (विनोद चव्हाण), स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे शरद अप्पा म्हस्के, पास्टर राजेश केळकर यांनी ख्रिश्चन फोरम, महाराष्ट्र राज्य परिट (धोबी) सेवा मंडळाचे शहराध्यक्ष काशिनाथ तेलंगे (दाताळकर) यांच्यासह इतर संघटनांनी महाविकास आघाडीचे विठ्ठल उर्फ नाना काटे यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button