breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडीदेश-विदेश

बीसीसीआयने अर्जुन पुरस्कारासाठी केली मोहम्मद शमीच्या नावाची शिफारस

Mohammed Shami : भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला त्याच्या दमदार कामगिरीचं फळ मिळण्याची शक्यता आहे. मोहम्मद शमीच्या कामगिरीसाठी बीसीसीआयने त्याच्या नावाची शिफारस मानाच्या अर्जुन पुरस्कारासाठी केली आहे. अर्जुन पुरस्कार हा क्रीडा क्षेत्रातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पुरस्कार आहे.

अशातच अर्जुन पुरस्काराच्या शर्यतीत मोहम्मद शमीचं नाव अव्वलस्थानी आहे. शमीने एकदिवसीय विश्वचषकात सर्वाधिक म्हणजे अवघ्या सात सामन्यांमध्ये २४ विकेट घेतल्या आहेत. त्यामुळे मोहम्मद शमी २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकात सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे.

हेही वाचा  –  ‘मासिक पाळी हे अपंगत्व नाही, त्यासाठी..’; स्मृती इराणी यांचं विधान चर्चेत

शमीने आतापर्यंत ६४ कसोटी, १०१ वनडे आणि २३ टी-२० सामन्यांमध्ये देशाचं प्रतिनिधित्व केलं आहे. तसेच शमीने कसोटीत २२९, वनडेत १९५ आणि टी-२० मध्ये एकूण २४ विकेट्स घेतल्या आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button