breaking-newsताज्या घडामोडीपुणे

कोरोनाची दहशत, परदेशातून आलेल्या कुटुंबाला सोसायटीत ‘नो एण्ट्री’

पुणे |महाईन्यूज|

पुण्यामध्ये कोरोनाचे 10 रुग्ण आढळल्याने नागरिकांमध्ये काहीसं भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. ‘पुण्यातील 10 पैकी 9 कोरोना रूग्ण हे फॉरेन रिटर्न आहेत. फक्त तो ओला ड्रायव्हर तेवढा लोकल ट्रान्समिट म्हणजेच आपल्या राज्यात संसर्गित आहे. ड्राय कफ म्हणजेच कोरडा खोकला असणाऱ्यांनी विनाकारण घाबरून जाऊ नये,’ असं आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केलं आहे.

एकीकडे जिल्हाधिकाऱ्यांकडून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत असताना पुण्यात वेगळीच घटना समोर आली आहे. मलेशियावरून आलेल्या एका कुटुंबाला पुण्यातील सोसायटीत प्रवेशच नाकारण्यात आला आहे. त्यामुळे कोरोना व्हायरसबाबत नागरिकांमध्ये किती भीती पसरली आहे, याचा अंदाज येऊ शकतो.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button