Uncategorizedआंतरराष्टीयदेश-विदेशराजकारण

आरआरएससह मोहन भागवतांच्या ‘डीपी’वर अखेर तिरंगा

मोदींचं आवाहन, विरोधकांचं टीकास्त्र

नागपूर । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त १३ ऑगस्ट म्हणजेच आजपासून १५ ऑगस्टपर्यंत तीन दिवस घरोघरी तिरंगा ही मोहीम संपूर्ण देशभरात राबवली जाणार आहे. केंद्र सरकारच्यावतीनं हे अभियान देशभर राबवण्यात आलं आहे. केंद्रात भाजपची सत्ता असल्यानं भाजपच्यावतीनं हे अभियान जोरदारपणे राबवले जात आहे. भाजप नेते या अभियानाच्या प्रचारासाठी कार्यक्रम घेत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील लोकांना त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटसवर तिरंगा ठेवण्याचं आवाहन केलं होतं. त्याच दरम्यान, दुसरीकडे भाजपची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सोशल मीडिया साईटसवरील डीपी न बदलल्यानं प्रश्न उपस्थित केले जात होते. अखेर १२ ऑगस्टला संघाच्या आणि सरसंघचालक मोहन भागवत यांच्या सोशल मीडिया अकाऊंटचा डीपी बदलून तिरंगा ठेवण्यात आला.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सोशल मीडिया अकाऊंटचा डीपी बदलला

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपल्या ट्विटर व फेसबुक खात्यांच्या ‘डीपी’वर शुक्रवारी राष्ट्रध्वज तिरंग्याचे छायाचित्र समाविष्ट केले. नागरिकांनी आपापल्या सोशल मीडियासंबंधी ‘डीपी’वर तिरंग्याचे छायाचित्र लावावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. परंतु संघाने आपल्या या खात्यांवरील भगव्या ध्वजाचा ‘डीपी’ न बदलल्याने त्यांच्यावर टीका झाली होती. संघाने हर घर तिरंगा मोहिमेत सुरुवातीपासून सक्रिय सहभाग घेतला असून या गोष्टी राजकारणापासून दूर ठेवायला हव्यात, असे संघाचे प्रवक्ता सुनील आंबेकर म्हणाले.

प्रश्न उपस्थित झाल्यानंतर संघाच्या डीपीवर तिरंगा
भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त विविध कार्यक्रम देशभर राबवण्यात येत आहेत. घरोघरी तिरंगा हा कार्यक्रम देखील राबवला जात आहे. नरेंद्र मोदी यांनी देशातील लोकांना आपापल्या सोशल मीडिया अकाऊंटसवर तिरंगा ठेवण्याच आव्हान केलं होतं. नरेंद्र मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देशातील अनेक नागरिकांनी डीपीवर तिरंगा ठेवला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देखील देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी तिरंगा हातात घेतलेला फोटो सोशल मीडियावरील डीपीला ठेवला. मात्र, त्याच वेळी काही नेत्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं सोशल मीडिया खात्यावरील डीपी बदलला नसल्यानं प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. अखेर राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं त्यांच्या ट्विटर आणि फेसबूक खात्यावर तिरंगा डीपी ठेवण्यात आलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button