ताज्या घडामोडीमुंबई

ठाणे-दिवा नव्या रेल्वे मार्गिकांचे उद्या मोदींच्या हस्ते होणार उद्घाटन

मुंबई  | मध्य रेल्वेवरील ठाणे-दिवा या रेल्वे स्थानकांदरम्यानच्या ५ व्या आणि ६ व्या दोन नव्या मार्गिकांचे उद्घाटन उद्या १८ फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान त्यांचे उद्घाटन करणार आहेत. यावेळी जादा ३६ उपनगरीय गाड्यांना ते हिरवा कंदील दाखवणार आहेत.

मध्य रेल्वेमार्गावर कल्याण मुख्य जंक्शन आहे. उत्तर आणि दक्षिणेतील रेल्वे तिथे एकत्र येतात. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण दरम्यान रेल्वेच्या यापूर्वी ४ मार्गिका होत्या. त्यातील २ धीम्या मार्गांसाठी आणि दोन जलद व मेल एक्सप्रेससाठी होत्या. जलद लोकल आणि मेल, एक्स्प्रेस एकाच मार्गावरून धावत असल्यामुळे दोन्ही सेवांमध्ये अडथळे येत होते. मात्र आता कुर्ला ते कल्याण दरम्यान ५ आणि ६ क्रमांकाचे नवे रेल्वे मार्ग तयार केले आहेत. त्यासाठी रेल्वेने सुमारे ६२० कोटी खर्च केले आहेत. रेल्वे फ्लायओव्हर, ३ मोठे पूल आणि २१ छोट्या पुलाचा यात समावेश आहे. यामुळे उपनगरी सेवा आणि मेल, एक्सप्रेससाठी वेगळी मार्गिका उपलब्ध झाली आहे. त्यामुळे मध्य रेल्वेवर ३६ जादा उपनगरी गाड्या सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्याचा फायदा प्रवाशांना होणार आहे. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते या नवीन रेल्वे मार्गांचे उद्या उद्घाटन होणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button