breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

सांस्कृतिक कार्य खात्याच्या अंतर्गत स्थापन केलेल्या अशासकीय समित्या बरखास्त

मुंबई । महाईन्यूज । प्रतिनिधी

सांस्कृतिक कार्य विभागाअंर्तगत सर्व अशासकीय सदस्य असलेल्या समित्या आणि मंडळ बरखास्त करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.याबाबत सांस्कृतिक कार्य विभागाने “शासन निर्णय”जारी केला.

   राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे यानी सर्व विभागातील अशासकीय सदस्य असलेल्या  समित्या बरखास्त करण्याचा निर्णय तातडीने  घेतला होता. त्यानुसार अनेक विभागाने  आपल्या विभागकडे असलेल्या समित्या बरखास्त केल्या.  मात्र सांस्कृतिक कार्य खात्यातील समन्वयाच्या अभावामुळे नेमका शासन निर्णय कोणत्या अधिकाऱ्यांच्या सहीने काढावा.  या चर्चेच्या फेऱ्यामुळे  विविध समित्या आणि मंडळ बरखास्त कारायला काही दिवस उशिर झाला होता.

  दादासाहेब फाळके चित्रनगरी,पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी,रंगभूमी परिनिरिक्षण मंडळ, विविध जीवन गौरव पुरस्कार निवड समिती, सर्व अनुदान आणि मानधन समित्या बरखास्त करण्यात आल्याचे सांस्कृतिक कार्य विभागाने म्हटले आहे.

 सन २०१४ मध्ये सांस्कृतिक कार्य विभागाने ज्या समित्यावर अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या केल्या होत्या, त्यापैकी अनेक सदस्यांनी तत्कालीन सरकराच्या विरोधात बोलून सरकारला अडचणीत  आणले  होते. एका पुरस्कार निवड समितीच्या सदस्याने तर “पुरस्कार वशीलेबाजीने मिळतो”असे खळबळजनक आरोप करुन सांस्कृतिक कार्य खात्याच्या अधिकाऱ्यांना तेव्हा अडचणीत आले होते.काही सदस्य वेळ मिळत नसल्याने  बैठकांना  फिरकत सुध्दा नाहीत. काहीची निवड तर कशाचा कशाशी ही  संबंध नसताना विविध समित्यावर झाली.    त्यामुळे यावेळी तरी योग्य सदस्यांची निवड होईल. अशी अपेक्षा सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या मान्यवरांचे मत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button