breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

‘मोदी एक्स्प्रेस’कोकणला रवाना; रावसाहेब दानवेंचा हिरवा झेंडा

मुंबई – दरवर्षी गणेश चतुर्थीच्या  निमित्ताने विशेष बस सोडण्यात येतात. या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात मानाचे स्थान देऊन कोकणाला प्राधान्य दिले आहे. त्यानंतर कोकणवासियांसाठी गणेशोत्सवानिमित्त गिफ्ट दिले असून गणेशोत्सवाकरिता कोकणात जाणाऱ्यांसाठी आज (ता.७) दादर स्थानकातून ‘मोदी’ एक्स्प्रेस’ ) रवाना झाली. रेल्वेराज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते या रेल्वेला हिरवा झेंडा दाखविण्यात आला. विशेष म्हणजे हा प्रवास मोफत असणार असून त्यासाठी आरक्षण करण्यात आले. यामुळे ‘मोदी एक्स्प्रेस’ ही विशेष रेल्वे चालवण्यात येत असून, १,८०० प्रवाशांना मोफत रेल्वेप्रवासाची सुविधा देण्यात आली आहे. या वेळी भाजपाचे नितेश राणे, प्रवीण दरेकर आदींसह आमदार- खासदार उपस्थित होते. सकाळी ११.४० मिनिटांनी ही गाडी सोडण्यात आली.

प्रवाश्यांमध्ये उत्साह; १,८०० प्रवाशांना मोफत रेल्वेप्रवासाची सुविधा

यंदाच्या गणेशोत्सवासाठी कोकणात गावी येणाऱ्या गणेशभक्तांसाठी ही ट्रेन आहे. 1 हजार 800 गणेशभक्तांसाठी कोकणातील गावी येण्यासाठी भाजपा आमदार नितेश राणे यांनी दादरहून स्पेशल मोदी एक्सप्रेस ट्रेनला हिरवा झेंडा दाखविला. कोकण रेल्वेच्या दादर ते सावंतवाडी रेल्वे स्टेशनदरम्यान ही ट्रेन धावणार असून एकूण 1 हजार 800 गणेशभक्तांना अगदी मोफत प्रवास या ट्रेनने करता येणार आहे. प्रवासादरम्यान सर्व प्रवाशांना एक वेळ भोजनाची मोफत सोय करण्यात येणार आहे. दादरहून प्लॅटफॉर्म क्रमांक 8 वरून ही ट्रेन सोडण्यात आली. आपल्या सीट रिझर्व्ह करण्यासाठी 27 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर पर्यंत बुकिंग करावं लागणार आहे. दादर स्थानकातून सुटणारी ही गाडी कणकवली, वैभववाडी आणि सावंतवाडी येथे थांबणार आहे. या रेल्वेच्या आरक्षणासाठी २७ ऑगस्ट ते १ सप्टेंबरदरम्यान संबंधित मंडळ अध्यक्षांकडे फोनद्वारे संपर्क साधावा, असे रेल्वेतर्फे स्पष्ट केले होते. डब्यांच्या उपलब्धतेनुसार रेल्वे भाड्याने दिली जाते. यासाठी डब्यांच्या आसनांनुसार तिकीट आकारले जाते.

दानवेंचा दौरा ठरलेल्या वेळेपक्षा १ तास उशिराने

भाजपा आमदार नितेश राणे यांनी ट्वीट करत ही माहिती दिली होती. त्यानुसार आज (ता.७) दादर स्थानकातून ही गाडी रवाना झाली असून कणकवली, वैभववाडी आणि सावंतवाडी येथे थांबणार आहे. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे दादर स्थानक येथे दाखल झाले रेल्वे राज्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर रावसाहेब दानवे यांचा मुंबईतील पहिलाच आज औपचारिक दौरा आहे . या दौऱ्यात ते मुंबई ते ठाणे दरम्यान लोकल ट्रेनने प्रवास करत मधल्या स्थानकावर काही ठिकाणी उतरून कामांचा आढावा घेणार आहेत. या कार्यक्रमासाठी दानवे तब्बल ५० मिनिटे उशिरा दाखल झाले, त्यामुळे तासभरापासून रेल्वेचे अधिकारी ताटकळत उभे होते. पहिलाच दौरा दानवे यांनी ठरलेल्या वेळेपक्षा १ तास उशिराने सुरू केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button