breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

“मी म्हटलं का माझ्या काकाला जाणता राजा म्हणा?”; अजित पवार

अजित पवार आपल्या विधानाशी ठाम
मुंबई : राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महराजांवर केलेल्या विधानामुळे राज्यात चांगलच वातावरण तापलं आहं. अनेक ठिकाणी अजित पवार यांच्याविरोधात मोर्चे काढले जात आहेत. त्यांच्या या वक्तव्याचा जाहिर निषेध केला जात आहे. दरम्यान अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिलं आहे.
यावेळी त्यांनी शरद पवार यांनाही जाणता राजा म्हणतात यावर भाजप आक्षेप घेतो. या प्रश्नावर अजित पवार यांनी आता मी म्हटलं का माझ्या काकाला जाणता राजा म्हणा? काय बोलतो राव. मी म्हणालो का की माझ्या काकाला तुम्ही जाणता राजा म्हणा. ज्यांनी तो शब्द प्रयोग केला त्याला जाऊन विचारा. आम्हाला कशाला विचारता? असं अजित पवार म्हणाले आहेत.
महापुरूषांबद्दल वादग्रस्त विधान भाजपच्या राज्यपालांनी केलं, मंत्र्यांनी केलंय आणि प्रवक्त्यांनी केलं आहे. मी वादग्रस्त विधान केलेलं नाही. मी आजही माझ्या विधानाशी ठाम आहे. शरद पवार हे आमचे सर्वेच्च नेते आहेत. त्यामुळे त्यांनी सांगितलेल्या मताशी मी सहमत राहणार. छत्रपती संभाजी महाराज स्वराज्यरक्षक आहेत. महापुरूषांबाबत मी कधीच बेताल वक्तव्य केलेलं नाही, असं अजित पवार म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराजांनंतर छत्रपती संभाजी महाराज यांनी स्वराज्याचं रक्षण करण्याचं काम केलं. स्वराज्यरक्षक करतो असं असताना त्यामध्ये सगळ्याच गोष्टी येतात. स्वराज्यात सर्व जाती धर्माचे नागरिक राहतात आणि त्यांच्या शौर्याबद्दल कुणाचेही दुमत नाही. त्यामुळे मी कुठलाही गुन्हा केलेला नाही. यामुळे विरोधकांनी माझा राजीनामा मागण्याऐवजी ज्यांनी महापुरूषांचा अपमान केला आहे. त्याच्याबद्दल आंदोलन करणाऱ्यांचं काय मत आहे? हे सांगावं, असा सवाल अजित पवार यांनी भाजपला केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button