breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

मनसेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळेंवर पत्नीकडून गुन्हा दाखल

नवी मुंबई – मनसेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्यावर त्यांची पत्नी संजीवनी काळे यांनी मानसिक आणि शारीरिक छळवणूक करणे, जातीवाचक शिवीगाळ करणे, आदी कलमांखाली नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. यामुळे नवी मुंबईतील मनसेच्या गोटात खळबळ उडाली आहे.

गजानन काळे यांच्या पत्नीने नेरुळ पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, गेल्या काही वर्षांपासून गजानन काळे हे त्यांच्या पत्नीला मारहाण करीत असून जातीवाचक शिवीगाळ करीत असल्याचा एफआयआरमध्ये उल्लेख केला आहे. तसेच गजानन काळे यांचे २०१८ पासून बाहेरील महिलांशी संबंध आहेत. हे सर्व माहीत असूनही आपण केवळ आपल्या पतीवरील प्रेमापोटी गप्प राहिलो पण आता सारे काही असह्य होऊ लागले आहे. आता माझ्या मुलाचे भविष्य मला घडवायचे आहे. गेल्या दोन महिन्यांपासून माझ्या पतीने मला घरखर्चाला पैसेही दिलेले नाहीत. अशा परिस्थितीत माझ्या मुलाला मी लहानाचा मोठा कसा करणार, असा प्रश्न निर्माण झाल्याने मी स्वतःच आता माझे पती गजानन काळे यांच्याविरोधात नेरुळ पोलिसांत तक्रार दाखल केली असल्याचे संजीवनी काळे यांनी म्हटले आहे. तसेच संजीवनी काळे यांनी अशा त्रासातून जाणाऱ्या इतर महिलांनाही असा अन्याय सहन करू नका, असे आवाहन केले आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button