breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

आमदार महेश लांडगे यांना गावकी-भावकीची ‘राजकीय भळभळती जखम’

  • गावकी-भावकीचा समतोल साधताना तारेवरची कसरत
  • झारीतील शुक्राचार्यांमुळे भोसरीत भाउबंदकीला खतपाणी

 

पिंपरी । विशेष प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवडच्या राजकीय पटलावर भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांची राजकीय भळभळती जखमी प्रकर्षाने वेदनादायी ठरताना दिसत आहे. २००२ मध्ये आपल्या राजकीय जीवनाला सुरूवात केल्यानंतर तब्बल १२ वर्षे महापालिकेतील महत्त्वाच्या पदासाठी लांडगे यांना प्रतीक्षा करावी लागली, ही वस्तुस्थिती आहे.

राष्ट्रवादीत असताना सुरूवातील तत्कालीन राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामुळे १२ वर्षांनंतर स्थायी समिती सभापतीपदी संधी मिळालेले आमदार लांडगे यांना विधानसभा निवडणुकीच्या तिकीटासाठीही झगडावे लागले होते. २००४ मध्ये तत्कालीन आमदार विलास लांडे यांच्या यांच्याविरोधात लांडगे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरावा, अशी शहरातील काही नेत्यांची अपेक्षा होती. त्यानंतर २००९ मध्ये पुन्हा तीच परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, राजकीय संयम ठेवत आमदार लांडगे यांनी २०१४ मध्ये स्वतंत्र मार्ग अवलंबला आणि यशस्वीही करुन दाखवला. परंतु, गावकी- भावकी हाच लांडगे- लांडे यांच्या राजकारणाचा मूळ पाया आहे, ही वस्तुस्थिती आहे. गावकी- भावकी आणि भाउबंदकीच्या राजकारणाचा भोसरीला एकप्रकारे अभिशाप आहे, असेच म्हणावे लागेल.

महापालिका पदवाटपातही नाराजीचे धनी…

दरम्यान, २०१७ मध्ये राष्ट्रवादीतील स्थानिक राजकारणामुळे नाराज असलेल्या नगरसेवकांनी आमदार लांडगे यांच्यासोबत  भाजपामध्ये प्रवेश केला. त्यावेळी ज्येष्ठतेनुसार सोबत आलेल्या सर्वांना पदवाटपात न्याय देण्याची भूमिका आमदार लांडगे यांनी ठेवली. परंतु, गावकी-भावकी पुन्हा उफाळून आली. सुरूवातील नितीन काळजे यांना महापौरपदी संधी दिल्याने राहुल जाधव नाराज झाले. जाधव यांना संधी दिली, त्यावर वसंत बोराटे आणि संतोष लोंढे नाराज झाले. स्थायी समिती सभापतीपदी सुरूवातीला सीमा सावळे यांना संधी दिल्यामुळे पुन्हा स्थानिक नाराज झाले. आता स्थायी समिती सभापतीपदी ॲड. नितीन लांडगे यांना सभापतीपदी संधी दिल्यानंतर नगरसेवक रवि लांडगे नाराज झाले आहेत.

महेश लांडगेंची राजकीय कोंडी…

महापालिकेत सत्ता मिळाल्यानंतर २०१७ पासून आमदार लांडगे यांनी महापौर, स्थायी समिती सभापती, विधी समिती, शहर सुधारणा समिती, क्रीडा समिती अशा विविध मानाच्या पदांवर समर्थक नगरसेवकांना संधी दिली. पूर्वी राष्ट्रवादीची सत्ता असताना अनेकांना पदवाटपात संधी मिळाली नाही. त्यामुळे भाजपाच्या गोटात अनेकजण सामील झाले. पण, भाजपामध्ये आल्यानंतर चार वर्षांत अनेकांची राजकीय महत्त्वाकांक्षा वाढली. पहिल्या टर्ममध्येच अनेकांना स्थायी सभापती, महापौर अशी स्वप्ने पडू लागली. त्यामुळे प्रत्येकाला  न्याय देता-देता आमदार महेश लांडगे यांची मात्र राजकीय कोंडी होताना दिसते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button