breaking-newsUncategorizedताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

स्मशानभूमीचे कामकाज पुन्हा आरोग्य विभागाकडे

  • पाच महिन्यात निर्णय बदलण्याची नामुष्की

पिंपरी ( महा ई न्यूज ) – शहरातील 42 स्मशानभूमी, दफनभूमीचे कामकाज पाच महिन्यात पुन्हा आरोग्य विभागाकडे सोपविण्याची नामुष्की महापालिका आयुक्त व प्रशासनावर ओढावली आहे. 27 फेब्रुवारी 2019 रोजी  आरोग्य विभागाकडील ही जबाबदारी काढून वैद्यकीय विभागाकडे सोपविण्यात आली होती. परंतु, आता पुन्हा त्यात फेरबदल केल्यामुळे दोन वर्षे होऊनही आयुक्त व प्रशासनाला कारभारात सुसूत्रता आणता आली नसल्याचेही स्पष्ट होते.

महापालिकेच्या शहरात 42 स्मशानभूमी, दफनभूमी आहेत. लिंगायत समाजासाठी एक, मुस्लिम समाजासाठी तीन आणि ख्रिश्चन समाजासाठी एक अशा पाच दफनभूमी आहेत. या दफनभूमीचे कामकाज त्या-त्या धर्माच्या संस्थाना देण्यात आले आहे. स्मशानभूमी, दफनभूमीच्या कामकाजाची जबाबदारी आरोग्य विभागाकडे होती. परंतु, 27 फेब्रुवारी 2019 रोजी आरोग्य विभागाकडील ही जबाबदारी वैद्यकीय विभागाकडे सोपविण्यात आली होती.

आता त्यामध्ये बदल करत पुन्हा स्मशानभूमीची जबाबदारी आरोग्य विभागाकडे सोपविली आहे. स्मशानभूमी, दफनभूमीचे पर्यवेक्षकीय नियंत्रण वैद्यकीय विभागामार्फत ठेवणे शक्य नाही. स्मशानभूमी, दफनभूमीच्या कामकाजासंदर्भात प्राप्त होणा-या बहुतांशी तक्रारी या सुरक्षा, आरोग्य या विभागाशी निगडीत आहेत. त्यामुळे स्मशानभूमीचे संपुर्ण कामकाज वैद्यकीय विभागाकडून आरोग्य विभागाकडे तरतूदीसह वर्ग करण्यात आले आहे. कामकाजामध्ये पारदर्शकता, गतीमानता आणण्यासाठी हा बदल केला असून अधिक्षण, तपासणी व नियंत्रण संबंधित सर्व कामकाज आरोग्य विभागाकडे वर्ग करण्यात आले आहे, असेही आदेशात नमूद केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button