breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महाविकास आघाडीत ‘बिघाडी’? : पिंपरी-चिंचवडमध्ये महापालिका काँग्रेस स्वबळावर लढणार!

  • प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या पदाधिकारी- कार्यकर्त्यांना सूचना
  • काँग्रेसचे राज्यातील १२ मंत्री शहरात जनता दरबार घेणार

 

पिंपरी । विशेष प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेची आगामी निवडणुकीत (२०२२) राज्यातील महाविकास आघाडीतील ‘किंग मेकर’ असलेली काँग्रेस स्वबळावर लढणार आहे. त्यादृष्टीने प्रत्येक बुथ आणि वॉर्डनिहाय पक्षबांधणीचे नियोजन करा, अशा सूचना पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिल्या आहेत. त्यामुळे महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीत ‘बिघाडी’ होणार? अशी शक्यता निर्माण झाली आहे.

महाराष्ट्र काँग्रेसचे नतून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुंबईतील प्रदेश कार्यालयात जिल्हानिहाय आढावा बैठका सुरू केल्या आहेत. पिंपरी-चिंचवडची आढावा बैठक मंगळवारी झाली. यावेळी माजी शहराध्यक्ष सचिन साठे, विष्णुपंत नेवाळे, शाम आगरवाल, कैलास कदम, गिरीजा कुदळे, शामला सोनवणे, मकरध्वज यादव, कवीचंद भाट, मयूर जयस्वार, बाळासाहेब साळुंखे, परशुराम गुंजाळ, नरेंद बनसोडे आदी उपस्थित होते.

संघटनेच्या माध्यमातून लोकांची कामे…

राज्यात महाविकास आघाडी अर्थात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे सरकार असले तरी पिंपरी-चिंचवडमध्ये काँग्रेस संघटनेच्या माध्यमातून लोकांची कामे होत नाहीत, अशी खंत पदाधिकाऱ्यांनी पटोले यांच्याकडे बोलून दाखवली. यावर राज्यातील काँग्रेसचे १२ मंत्री पिंपरी-चिंचवडमध्ये जनता दरबार घेतील. त्यांच्या माध्यमातून नागरिकांची कामे मार्गी लावली जातील. त्याचा फायदा पक्ष संघटनेला होईल, असे आश्वासन पटोले यांनी दिले आहे.

चार-पाच दिवसांत शहराध्यक्षपदाचा निर्णय…

पिंपरी-चिंचवड काँग्रेस शहराध्यक्षपदाची धुरा सचिन साठे यांच्याकडे होती. मात्र, त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे नवीन शहराध्यक्षपदी कुणाची वर्णी लागणार याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष आहे. दरम्यान, शहराध्यक्षपदासाठी माजी शिक्षण मंडळ सभापती विष्णुपंत नेवाळे, माजी नगरसेवक कैलास कदम यांची नावे चर्चेत आहेत. शहरातील राजकीय परिस्थिती पाहता सक्षम नेतृत्व देण्याचा मानस प्रदेश नेतृत्त्वाचा आहे. त्यामुळे आगामी चार-पाच दिवसांत शहराध्यक्षपदाची घोषणा होईल, असे संकेत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button