TOP Newsटेक -तंत्रताज्या घडामोडीदृष्टीक्षेपपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्र

आमदार अण्णा बनसोडे यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन; बोपखेल आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे मागे घ्या

पिंपरी : बोपखेल मधील रस्त्यासाठी २०१५ साली झालेल्या आंदोलनात दोनशेहून अधिक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. हे गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांनी केली आहे. आमदार बनसोडे यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विरोधी पक्षनेते अजित पवार यांना निवेदन दिले आहे.

पिंपरी विधानसभेचा अविभाज्य भाग असलेला बोपखेल परिसर 2015 मध्ये रस्त्याच्या अभावी दूरवर झाला होता. CME दापोडी मधून जाणारा रस्ता सुरक्षेच्या कारणावरून कायमस्वरूपी बंद करण्यात आला. त्यावेळी बोपखेलवासीय एकजुटीने रस्त्यावर उतरले त्यांना त्यांचा हक्काचा रस्ता हवा होता. मात्र देशाची सुरक्षितता व भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता त्यांचा संघर्ष आजतागायत सुरू आहे.

केंद्राच्या अखत्यारीत असलेला हा विषय लवकरच मार्गी लावण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र दरम्यानच्या काळात २०१५ मध्ये झालेल्या आंदोलनात जवळपास २०० पेक्षा जास्त बोपखेलवासीयांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यांना तुरुंगात डांबले गेले. त्या सर्व कार्यकर्त्यांना व त्यांच्या घरच्यांना रस्ता आंदोलनाच्या झळा आज देखील सोसाव्या लागत आहेत. आज त्या आंदोलनकर्त्या कार्यकर्त्यावरील गुन्हे मागे घ्यावेत यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व विरोधी पक्षनेते अजित पवार यांना भेटून आमदार अण्णा बनसोडे यांनी निवेदन दिले.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येत्या पावसाळी अधिवेशनात हा विषय निकाली काढण्यात येईल असे आश्वासन दिले. तर राज्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत चर्चा करून लवकरच गुन्हे माघे घ्यायला लावू असे आश्वासन दिले.
यावेळी माजी नगरसेवक भाऊसाहेब सुपे, बापुजीबुवा देवस्थानचे अध्यक्ष श्रीरंग ज्ञानोबा धोदाडे, दलित पँथर पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष महेद्रंभाऊ वाघमारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष शशिकांतभाऊ घुले, युवती सेना पुणे जिल्हा अध्यक्ष प्रतीक्षा घुले, राष्ट्रवादी काँग्रेसचे सेवा दलाचे अध्यक्ष महेश झपके व बोपखेल मधील कार्यकर्ते उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button