breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

पुणे विभागीय अप्पर आयुक्त डॉ. अनिल रामोड अखेर निलंबित

पुणे : लाचखोरी प्रकरणात न्यायालायीन कोठडीत असलेले पुणे विभागीय अपर आयुक्त डॉ. अनिल रामोड यांना अखेर निलंबित करण्यात आले आहे. अनिल रामोड यांच्या निलंबनाचा आदेश बुधवारी रात्री जारी करण्यात आला. सोलापूर जिल्ह्यातील जागेचे भूसंपादनाचा मोबदला वाढवून देण्यासाठी डॉ. रामोड यांनी आठ लाख रुपयांची लाच स्वीकरातना सीबीआयच्या पथकाने अटक केली होती.

डॉ. रामोड हे पोलिस कोठडीतनंतर न्यायालयीन कोठडीत आहेत. त्या दरम्यान, डॉ. रामोड यांनी वकिलामार्फत न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. विभागीय आयुक्तालयात पुन्हा ते रुजू झाल्यास या खटल्यावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करून त्यांना निलंबित करण्याची मागणी सीबीआयने विभागीय आय़ुक्तांकडे केली होती.

सीबीआयच्या मागणीचा आधार घेत विभागीय आयुक्तालयाने राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाला निलंबनाचा प्रस्ताव पाठविला होता. तो मंजूर झाला असून, डॉ. रामोड याच्या बदलीचे आदेश जारी करण्यात आले आहे.

हेही वाचा – ‘रिक्षा चालक मालकांसाठी तातडीने कल्याणकारी महामंडळ गठीत होणार’; उदय सामंत

राज्य सरकारने पाठविलेल्या आदेशात डॉ. राठोड हे ४८ तासापेक्षा पोलिस कोठडीत राहिले आहेत. त्यामुळे त्यांना निलंबनाची कारवाई करण्यात येत आहे. तसेच निलंबनानंतरही त्यांनी पुणे हे मुख्यालय सोडून जाऊ नये. तसेच कोणतीही खासगी नोकरी अथवा अन्य व्यवसाय करू नये. तसेच पुण्याबाहेर जाण्यापूर्वी विभागीय आयुक्तांची परवानगी घेतल्याशिवाय जाऊ नये, असेही त्यात म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button