breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

”मिशन पिंपरी-चिंचवड महापालिका”; 2022 मध्ये शिवसेनेचा भगवा फडकविणार – अॅड सचिन भोसले

  • शिवसेना@55 वा वर्धापन दिनानिमित्त पिंपरी-चिंचवड शहर शिवसेनेचा निर्धार

पिंपरी |महाईन्यूज|

पिंपरी चिंचवड शहरवासियांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यास सत्ताधारी भाजप अपयशी ठरली आहे. गेल्या साडेचार वर्षात पाणी, कचरा, आरोग्य या पायाभूत सोयी-सुविधांचे प्रश्न सोडविता आले नाहीत. तसेच महापालिका हे भ्रष्टाचाराचे कुरण बनली असून करदात्या नागरिकांच्या पैशाची लूट होवू लागली आहे. त्यामुळे शिवसैनिकांनी रणनिती आखून महापालिकेवर भगवा फडवण्यासाठी वज्रमुठ बांधावी, असं आवाहन शहराध्यक्ष तथा नगरसेवक अॅड सचिन भोसले यांनी केले.

शिवसेना 55 वा वर्धापन दिनानिमित्त पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने आकुर्डी सेना भवन येथे छत्रपती शिवाजी महाराज, हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे, माॅं साहेब यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी माजी आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार, सहसंपर्कप्रमुख योगेश बाबर, जिल्हा संघटिका सुलभाताई उबाळे, उपजिल्हा संघटिका वैशालीताई मराठे, शहर संघटिका ॲड. उर्मिलाताई काळभोर, कामगार नेते इरफान भाई सय्यद, युवा अधिकारी विश्वजीत बारणे, सरिता साने, उपशहरप्रमुख तुषार नवले, अनिल सोमवंशी, अमोल निकम, नवनाथ तरस, अनंता कोराळे, पांडुरंग पाटील, वैशाली कुलथे, शिवसेनेचे विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख, महिला महिला आघाडीचे सर्व पदाधिकारी, युवा सेनेचे सर्व पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भोसले म्हणाले की, शिवसेना पक्षप्रमुख, राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे हे राज्यातील सर्वसामान्य, तळागाळातील जनतेच्या हितासाठी अहोरात्र काम करीत आहेत. कोरोना सारख्या जागतिक महामारीवर योग्य नियोजन, औषधोपचार व धाडसी निर्णय घेतल्याने राज्यातील कोरोना बाधितांची रुग्ण संख्या आटोक्यात आली. त्यानूसार शिवसेनेचे पश्चिम महाराष्ट्राचे समन्वयक आणि संपर्क प्रमुख रविंद्र मिर्लेकर, संपर्क प्रमुख बाळाभाई कदम, खासदार श्रीरंग बारणे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुका लढविणार असून मागील साडेचार वर्षात भाजपाने केलेला भ्रष्ट्राचार पुराव्यानिशी नागरिकांसमोर मांडून पोलखोल करणार आहे. भाजपाने ज्या चुकीच्या गोष्टी केल्या आहेत. त्या विरोधात मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल. वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून निदर्शने करण्यात येतील. शहरवासियांचे प्रश्न शिवसेनेच्या माध्यमातून सोडवण्यात येतील.असंही ते म्हणाले.

यावेळी माजी आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार, सहसंपर्कप्रमुख योगेश बाबर, जिल्हा संघटिका सुलभाताई उबाळे, शहर संघटिका ॲड. उर्मिलाताई काळभोर यांनी मार्गदर्शन केले. फेब्रुवारी 2022 मध्ये होणा-या पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणूकीत मनपा भवनावर भगवा फडकवण्याचा निर्धार सर्वांनी व्यक्त केला. त्याचबरोबर सर्वांनी एकजुटीने व्यूहरचना करुन योग्य रणनीती करण्याचा निश्चय व्यक्त केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button