breaking-newsTOP Newsपिंपरी / चिंचवड

महापालिका आयुक्त साहेब… हे काय? : शहरात ‘लॉकडाउन’ अन्‌ नदीपात्रात प्रशिक्षण शिबीर!

महापालिका प्रशासनाकडूनच ‘लॉकडाउन’च्या नियमांचे उल्लंघन

संबंधित अधिकारी आणि प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेला ‘सॉफ्ट कॉर्नर’

पिंपरी । विशेष प्रतिनिधी

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी दोन्ही शहरांमध्ये लॉकडाउन सुरू केला आहे. मात्र, महापालिका प्रशासनाने लॉकडाउन काळातही प्रशिक्षण वर्ग सुरू ठेवले आहेत. आपत्ती व्यवस्थापन विभागाने आयुक्त श्रावण हर्डिकर यांचे आदेश धाब्यावर मारले आहेत काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर राज्य शाहराने साथ रोग अधिनियम १८९७ मधील खंड २, ३ व ४ तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ व महाराष्ट्र कोविड उपाययोजना, २०२० याच्या अन्य सर्व सहाय्यकारी तरतुदी अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी आदेश देवून दि. १४ जून पहाटे १ वाजलेपासून दि. २३ जून २०२० पर्यंत संपूर्ण टाळेबंदी जाहीर केली आहे.

आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार, टाळेबंदीमध्ये काय बंद राहील…या नियमावलीमध्ये अनु. क्र. H नुसार शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था सर्व प्रकारचे शिकवणी वर्ग बंद राहतील, असा स्पष्ट उल्लेख आहे.  मात्र, महापालिका आपत्ती व्यवस्थान विभाग आणि अग्निशमन विभाग दलाच्या वतीने शहरातील पुरग्रस्त भागांतील २५ तरुणांची निवड करुन प्रशिक्षण वर्ग सुरू केले आहेत.

विशेष म्हणजे, याची माहिती ‘पीसीएमसी स्मार्ट सारथी’द्वारे सोशल मीडियावर प्रसिद्ध केली आहे. यामध्ये दाखवलेल्या फोटोमध्ये एका छोट्या बोटीवर पाच तरुण सराव करताना दिसतात. फिजिकल डिस्टंटसिंगबाबत प्रशासन जनजागृती करण्यासाठी मोठ-मोठ्या घोषणा करीत आहे. पण, इथे प्रशासनाचेच काही विभाग आयुक्तांच्या आदेशाला जुमानत नाहीत, ही बाब चिंताजनक आहे.

दुसरीकडे, आपत्ती व्यवस्थान विभागाला लॉकडाउनचे नियम लागू होत नाहीत काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. याबाबत महापालिका आयुक्त काय निर्णय घेणार? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button