breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवड

मिशन-२०२२ : पदवीधर निवडणुकीच्या विजयाची पिंपरी-चिंचवडमध्ये होणार पुनरावृत्ती?

शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील यांची ‘सुशिक्षीत टीम’ लागली कामाला

पक्ष कार्यालयात पदवीधर संघाच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक

 

पिंपरी । अधिक दिवे

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत पुणे पदवीधर मतदार संघात झालेल्या ऐतिहासिक विजयाची पुनरावृत्ती करण्याचा संकल्प राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदवीधर संघाने केला आहे. त्यासाठी शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील यांची ‘उच्चशिक्षीत टीम’ कामाला लागली आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपाला आव्हान निर्माण झाले आहे.

डिसेंबर- २०२० मध्ये झालेल्या पुणे पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड यांचा दणदणीत विजय झाला होता. भाजपाचे उमेदवार संग्राम देशमुख यांना पराभव स्वीकाराला लागला होता. पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांतील २ लाख ४७ हजार ५० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. मात्र, पहिल्या फेरीतच लाड यांनी १ लाख २२ हजार १४५ मते मिळवत विजयावर शिक्कामोर्तब केले होते.

या निकालामुळे भाजपाची शहरी भागातील मक्तेदारी मोडीत काढली होती. वर्षभरापूर्वी झालेल्या या निवडणुकीत ‘‘ पदवीधर मतदार म्हणजे ज्यांना डोकं आहे, ते मतदारांनी महाविकास आघाडी पर्यायाने राष्ट्रवादीला पसंती दिली आहे.’’ ही वस्तुस्थिती आहे. संपूर्ण ताकद लावूनही भाजपला पिंपरी-चिंचवड आणि पुण्यातून आपल्या उमेदवाराला ‘लीड’ देता आले नाही. याउलट, पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी  काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील आणि सहकाऱ्यांनी पदवीधरांची मोट बांधली आणि यशस्वीही करुन दाखवली होती.  या विजयाची पुनरावृत्ती करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुन्हा सज्ज झाली आहे, असा दावा शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील यांनी केला आहे.

पदवीधर पदाधिकाऱ्यांची मॅरेथॉन बैठक…

महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी पदवीधर संघाचे अध्यक्ष सुनील पाटील राज्यव्यापी दौऱ्यावर आहेत. पिंपरी-चिंचवड येथे आले असता पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी पदवीधर संघाची आढावा बैठक घेतली. महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी पदवीधर संघाचे अध्यक्ष सुनील पाटील म्हणाले की पुणे पदवीधर आमदार अरुण लाड यांच्या मदतीने ‘पदवीधर आर्थिक विकास महामंडळ’ स्थापन करण्यात येणार असून त्याद्वारे पदवीधरांना विविध कौशल्य शिकण्यासाठी आणि नोकरीसाठी मदत करण्यात येईल. शहर राष्ट्रवादीचे प्रवक्ते फाझल शेख, लीगल सेल अध्यक्ष गोरक्ष लोखंडे, महिला कार्याध्यक्ष पुष्पा शेळके , चिंचवड विधानसभा अध्यक्षा संगीत कोकणे, शिल्पा बिडकर, ज्योती निंबाळकर, आशा शिंदे, वाळकेताई, सामाजिक न्याय सेलचे कार्याध्यक्ष बाळासाहेब पिल्लेवार, सुदाम शिंदे, दत्तात्रय बनसोडे आदी उपस्तिथ होते.

काय म्हणाले संजोग वाघेरे-पाटील…?

यावेळी शहर अध्यक्ष संजोग वाघेरे पाटील म्हणाले की, महाविकास आघाडी चे पदवीधरांची आमदार अरुण लाड  निवडून आले. त्यासाठी राष्ट्रवादी पिंपरी-चिंचवड कुटुंबाने आघाडीने मेहनत घेतली. सुशिक्षित मतदारांसमोर राष्ट्रवादी पदवीधर संघ पक्षाची बाजू मांडतील, असा विश्वासही वाघेरे-पाटील यांनी व्यक्त केला.

पक्षाची धोरणे सुशिक्षीत लोकांपर्यंत पोहोचवणार : माधव पाटील

बैठकीत शहराचे पदवीधारचे अध्यक्ष माधव पाटील यांनी आजपर्यंत केलेल्या कामाचा आढावा सादर केला.त्यात रक्तदान शिबीर , इंधन दरवाढ विरोधात आंदोलन , गरिबांना फूड पॅकेट्स वाटप , पूरग्रस्तांना मदत , शहरातील विविध नोकऱ्यांचे उपडेट आणि कोरोना योद्धा सन्मान या उपक्रमाची माहिती माधव पाटील यांनी दिली. यावेळी सुशिक्षित मतदारांना पक्षाची ध्येय धोरणे पोहोचवण्यासाठी पदवीधर काम करतील, असे माधव पाटील म्हणाले.

कोविड योद्धांचा सन्मान आणि संघटनात्मक बांधणी…

प्रदेशाध्यक्ष सुनील पाटील आणि सरचिटणीस विशाल सूर्यवंशी यांच्या हस्ते पक्षातील सहकाऱ्यांना ‘कोविड योद्धा’ म्हणून सन्मानित करण्यात आले. यावेळी ५ जणांची पदवीधरमध्ये पद नियुक्ती करण्यात आली.भोसरी येथे वृक्षारोपण करण्यात आले.महाराष्ट्र प्रदेशचे सरचिटणीस विशाल सूर्यवंशी , शेषराज भोसले , निखिल मांढरे , अमित पाटील आणि संतोष मेंगाणे उपस्तिथ होते. यावेळी पिंपरी चिंचवड पदवीधर कार्याध्यक्ष युनूस शेख, उपाध्यक्ष जॉन डिसोझा , एजाज चौधरी , शबाना पठाण , वंदना पेडणेकर, स्नेहा शिंदे , अभिजित कदम , जान्हवी पंदारे, चेतन कोठारी , विजयता वाधवा आदी उपस्तिथ होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button