breaking-newsराष्ट्रिय

सुहेल सेठ यांना हादरा, ‘टाटा सन्स’ने करार मोडला

भारतातील ‘मी टू’ मोहिमेच्या वावटळीत प्रख्यात लेखक आणि जाहिरात क्षेत्रातील दिग्गज सुहेल सेठ हे सापडल्यानंतर टाटा समुहातील टाटा सन्स या कंपनीने सुहेल सेठ यांच्यासोबतचा करार मोडण्याचा निर्णय घेतला आहे. सुहेल सेठ हे टाटा सन्सचे सल्लागार होते.

‘मी टू’ मोहिमेअंतर्गत सुहेल सेठ यांच्यावर पाच महिलांनी लैंगिक छळाचे आरोप केले होते. सोशल मीडियावरुन या महिलांनी छळाला वाचा फोडली होती. एका महिलेने ऑगस्ट २०१० मधील घटनेचा दाखला दिला होता. आपण १७ वर्षांच्या असताना सेठ यांची ‘फॅन’ म्हणून ट्विटरवर त्यांना फॉलो करीत होतो. मात्र एकदा त्यांनी संदेश पाठवून त्यांच्यासोबत मद्यपान करण्याचे आमंत्रण दिले, तसेच आपल्याला लज्जा वाटेल असाही संदेश आपल्याला पाठवला, असे महिलेने म्हटले होते.

तर मॉडेल आणि बिग बॉस-८ ची स्पर्धक डायेंड्रा सोरेसनेही सुहेल सेठ यांच्यावर आरोप केले होते. सुहेल सेठ यांनी पार्टीदरम्यान माझ्याशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. इतकचं नाही तर त्यांनी माझं बळजबरीने चुंबन घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांना प्रतिकार करत मी जोरात त्यांच्या जीभेचा चावा घेतला. याप्रकारानंतर सुहेल सेठ यांना प्रचंड वेदना होऊन ते एखाद्या लहान मुलाप्रमाणे कळवळू लागले. मात्र त्यांना दिलेली ही शिक्षा त्यांच्या चांगलीच लक्षात राहिली आहे, असं डायेंड्रा म्हणाली होती. आणखी तीन महिलांनीही सुहेल सेठ यांच्यावर अशाच स्वरुपाचे आरोप केले होते. या आरोपांच्या पार्श्वभूमीवर टाटा सन्स सुहेल सेठ यांच्यासोबतचा करार संपुष्टात आल्याची घोषणा सोमवारी केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button