breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

शासनाच्या ‘ब्रेकिंग’ निर्णयांचे शिवसेनेला कौतुक, आरोप करणाऱ्या विरोधकांवर टीका

सार्वत्रिक निवडणुकांच्या तोंडावर राज्य शासनाने घेतलेल्या २२ निर्णयांचे शिवसेनेकडून कौतुक करण्यात आले आहे. तसेच नवीन उद्योग धोरणांमुळे राज्य यापुढेही पहिल्या क्रमांकावर राहिल याबाबत आपल्या मनात शंका नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुखपत्रातील अग्रलेखातून म्हटले आहे. तर निवडणुकीच्या तोंडावर हे निर्णय घेण्यात आल्याचे विरोधकांचे म्हणणे हे नेहमीचे तुणतुणे आहे, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंकडून टीका करण्यात आली आहे.

खरंतर भाजप आणि शिवसेनेने प्रतिष्ठेचे केलेले विषय लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी लागू करण्याची लगीनघाई सरकारमध्ये सुरू आहे. उद्योग धोरण जाहीर करून शिवसेनेला खूश करण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना सरकारने घेतलेल्या निर्णयांची जंत्री वाचून दाखविणे शक्य व्हावे म्हणून घाईघाईत निर्णय घेतले जात आहेत.

यापूर्वी सत्तेत असतानाही साडेचार वर्षे राज्य शासनावर कायमच बाण उडवणाऱ्या शिवसेनेला खुश करणारे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यामुळे आता सरकारचे तोंडभरुन कौतुक केले जात आहे. सत्तेत कुणीही असले तरी आपापल्या परीने ते राज्य चालवण्याचा प्रयत्न करीत असतात. मात्र, विरोधात हे कसे फसवे आहे किंवा निवडणुकीच्या तोंडावर मतदारांना खूश वगैरे करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे हे नेहमीचेच तुणतुणे वाजवीत असतात, असे शिवसेनेने म्हटले आहे.

महाराष्ट्रासारखे प्रगतशील राज्य उद्योग क्षेत्रात मागे पडल्याची बोंब ठोकणारे विरोधक जर राज्य शासनाच्या आजच्या ‘उद्योग धोरणा’वरही टिप्पणी करणार असतील तर त्यांच्या हेतूबद्दल आपल्याला संशय असल्याचे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे. काही वर्षांपूर्वी महाराष्ट्राचे अव्वल स्थान घसरले होते, हे पाप सलग पंधरा वर्षे सत्ता उपभोगणाऱ्या आधीच्या राज्यकर्त्यांचे आहे. त्यामुळेच राज्यातील हुशार मुलं मधल्या काळात महाराष्ट्राबाहेर गेली. मात्र, आता नव्या उद्योग धोरणामुळे हे ‘आऊटसोर्सिंग’ थांबेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button