ताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्र

क्षेपणास्त्र तंत्रज्ञान विकासात “मिसाईल मॅन ऑफ इंडीया ” डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांचे उत्तुंग कार्य-अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती उत्साहात साजरी

पिंपरी : भारताचे माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम हे अग्नी,पृथ्वी यासारखी स्वदेशी मार्गदर्शित क्षेपणास्त्रे विकसित करणारे थोर शास्त्रज्ञ तर होतेच शिवाय त्यांनी अनेक वर्ष पंतप्रधानांचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार म्हणूनही काम केले होते, क्षेपणास्त्र तंत्रज्ञान विकासात केलेल्या त्यांच्या उत्तम कामगिरीमुळे त्यांना “मिसाईल मॅन ऑफ इंडीया” म्हणूनही ओळखले जाते असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील झालेल्या कार्यक्रमात भारतरत्न डाॅ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त जगताप यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

जयंतीच्या या कार्यक्रमास मुख्य सुरक्षा अधिकारी मेजर उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड,जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, मुख्य लिपिक वसिम कुरेशी आणि विविध विभागातील कर्मचारी उपस्थित होते.

अतिरिक्त आयुक्त जगताप यांनी डॉ.ए.पी.जे.अब्दुल हे प्रखर देशभक्त होते, तसेच ते उत्तम व्याख्यातेही होते, देशाची संरक्षण व्यवस्था बळकट करण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या अभूतपूर्व कामगिरीबद्दल त्यांना भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले होते असे सांगून डॉ.ए.पी.जे.अब्दुल यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अण्वस्त्र व क्षेपणास्त्र व्यवस्था सक्षम करून देशासाठी दिलेले योगदान कायम स्मरणात राहील असेही जगताप यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button