breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रिय

‘भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवार अश्विनी जगताप यांचा विजय निश्चित’; श्रीरंग बारणे

खासदार श्रीरंग बारणे यांनी सहपत्निक केलं मतदान

पिंपरी : चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी आज (२६ फेब्रुवारी) मतदान पार पडत आहे. दोन्ही मतदारसंघात चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. चिंचवडमध्ये भाजप उमेदवार अश्विनी जगताप, मविआ उमेदवार नाना काटे आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे अशी लढत असणार आहे.

मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी आज सकाळी सहपत्नीक मतदानाचा हक्क बजावला. थेरगावातील संचेती प्राशमिक व माध्यमिक शालेच्या मतदान केंद्रावर खासदार बारणे यांनी आपला मतदानाचा हक्क बजाविला. त्यांच्या पत्नी सरिता बारणे यांनीही आपले मतदान केले.

मतदान हा आपला मूलभूत हक्क आहे. सर्वांनी मतदानाचा हक्क बजवावा. या निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवार अश्विनी जगताप यांचा विजय निश्चित असल्याचे खासदार श्रीरंग बारणे म्हणाले.

दरम्यान, दरम्यान, चिंचवड विधानसभा मतदारसंघात एकूण ५ लाख ६८ हजार ९५४ मतदार आहे. पोटनिवडणुकीसाठी ५१० मतदार केंद्रावर मतदान पार पडत आहे. सकाळी ७ वाजल्यापासून ११ वाजल्या पर्यंत १०.४५ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button