TOP Newsताज्या घडामोडीपुणे

मेट्रो रेल्वेचे तिकीट आता व्हॉट्सअ‍ॅपवर!; प्रवाशांनी लाभ घेण्याचे महामेट्रोचे आवाहन

पुणे : मेट्रो प्रवासाचे तिकीट काढण्यासाठी प्रवाशांना रांगेत उभे राहावयाला लागू नये आणि त्यांच्या वेळेची बचत व्हावी, यासाठी व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून तिकीट काढण्याची सुविधा महामेट्रोकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे. मेट्रो प्रकल्पाअंतर्गत पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात दोन मेट्रो मार्गिकांची कामे सुरू आहेत. यातील काही अंतरावर मेट्रोची प्रवासी सेवा सुरू झाली असून येत्या काही दिवसांत आणखी काही अंतरावर मेट्रोची प्रवासी सेवा सुरू होणार आहे. त्यामुळे प्रवाशांना विनासायास मेट्रो प्रवासाचे तिकीट मिळावे, यासाठी महामेट्रोकडून ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

मेट्रोने सुरू केलेल्या ९४२०१०१९९० या क्रमांकावर व्हॉट्सअ‍ॅप केल्यावर प्रवाशांच्या मोबाइलवरच क्यूआर कोड येईल आणि त्याच्या माध्यमातून मोबाइलवरच तिकीट मिळणार आहे. दोन पद्धतीने प्रवाशांना तिकीट काढता येणार आहे. मेट्रोने प्रत्येक स्थानकात उपलब्ध करून दिलेल्या किऑस्क मशिनच्या सहाय्याने प्रवासी स्वत: हे तिकीट काढू शकतो. तर स्थानकात जाऊन टॉम ऑपरेटरशी संपर्क साधून ई-तिकीट मिळवता येईल. ही सुविधा मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये उपलब्ध आहे, अशी माहिती महामेट्रोकडून देण्यात आली. व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटद्वारे तिकिटे मिळण्याची सुविधा देण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना सुलभ प्रवास करता येणे शक्य आहे. नवीन तिकीट प्रणालीने प्रवाशांचा वेळ वाचणार असून या सुविधेचा प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी केले आहे.

किऑस्क मशिनने कसे काढाल तिकीट?

  • किऑस्क मशिनवर प्रवासाचा मार्ग निवडल्यानंतर तिकिटाचे पैसे देताना कागदी तिकीट किंवा ई-तिकीट यापैकी हवा तो पर्याय निवडावा.
  • ई-तिकीट असा पर्याय निवडल्यावर आलेला स्कॅनर ( दफ कोड) आपल्या मोबाइलद्वारे स्कॅन करावा. स्कॅन केल्यानंतर व्हॉट्सअ‍ॅपवर क्रमांकावर ओटीपी येईल. तो ओटापी किऑस्क मशिनमध्ये टाइप केल्यानंतर मोबाइलवर लिंक उपलब्ध होईल. त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर ई-तिकीट दिसेल.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button