breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

बॉलिवूड अभिनेत्री तमन्ना कोरोना पॉझिटिव्ह

मुंबई – भारतात कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढताना दिसत आहे. या धोकादायक विषाणूची झळ सर्वसामान्य जनतेसह सेलिब्रिटींनादेखील बसली आहे. आतापर्यंत अनेक कलाकारांनी कोरोना विषाणूवर मात केली आहे. आता अभिनेत्री तमन्ना भाटियाला कोरोनाची लागण झाली आहे. तिला उपचारांसाठी हैदराबादच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. देशभरातील तिचे चाहते सोशल मीडियावर तिला लवकरात लवकर बरे वाटावे म्हणून शुभेच्छा पाठवत आहेत.

मन्ना भाटिया तिच्या आगामी वेब-सीरिजच्या चित्रीकरणासाठी हैदराबादला होती. चित्रीकरणादरम्यान तिच्यात कोरोनाची लक्षणे दिसून आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून कोरोना चाचणी करण्यात आली होती. वेब-सिरीजच्या चित्रीकरणासाठी हैद्राबादला रवाना होण्यापूर्वी तमन्ना मुंबईत होती.

दरम्यान, ऑगस्ट महिन्यात तमन्नाच्या पालकांना कोरोना झाला होता. तमन्नाने स्वतः ट्विट करत आपल्या आई-वडिलांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. ‘माझ्या पालकांमध्ये कोरोनासारखी सौम्य लक्षणे दिसत होती. आम्ही त्यावेळी घरात आवश्यक ती खबरदारी घेतली आणि घरातील सर्वांनी कोरोना चाचणी केली. दुर्दैवाने माझ्या पालकांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. आता आम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आवश्यक ती सर्व काळजी घेत आहोत’, त्यावेळी तिने आपल्या आई-वडिलांशिवाय कुटुंबातील कुणालाही कोरोना झाला नसल्याचे सांगितले होते. मात्र आता तीदेखील कोरोनाच्या विळख्यात सापडली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button