breaking-newsTOP Newsआरोग्यताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

#Covid-19: ‘ब्रेक द चेन’: आजपासून कडक लॉकडाऊन, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तांनी जाहीर केली नियमावली..!

पिंपरी |

राज्यात ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत निर्बंध अधिक कडक केले आहेत. अत्यावश्यक सेवेशी संबंधित वगळता सर्व शासकीय कार्यालये कर्मचाऱ्यांच्या १५ टक्के उपस्थितीत सुरू राहतील. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी उपस्थिती ५० टक्क्यांपेक्षा जास्त असणार नाही. लग्न समारंभ २५ लोकांच्या उपस्थितीत केवळ दोन तासांच्या कालावधीत पूर्ण करावे लागणार आहेत. नियमांचे उल्लंघन केल्यास वधू वर पक्षावर ५० हजार रुपये दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. हॉल, मंगल कार्यालयाकडून उल्लंघन झाल्यास कोरोना संपेपर्यंत आस्थापना बंद करण्यात येईल, असे आदेश पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी जारी केले आहेत.

●१) कार्यालयातील उपस्थिती –

▪अ) सर्व शासकीय कार्यालये (राज्य केंद्र आणि स्थानिक प्राधिकरणाच्या अखत्यारितील अत्यावश्यक सेवेशी संबंधित कार्यालये वगळता कर्मचार्यांच्या १५% उपस्थितीत सुरु राहतील.
• उपरोक्त कार्यालये/आस्थापना यांना यापेक्षा जास्त कर्मचारी उपस्थित असणे आवश्यक असल्यास संबंधित आस्थापना प्रमुख यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागाची परवानगी घ्यावी.

▪ब) पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रासाठी निर्गमित केलेल्या दिनांक १४.०४.२०२१ रोजीच्या आदेशातील मुद्दा क्र. ५ (Exemption Category) मध्ये नमूद सर्व कार्यालये १५% किंवा ५ यापैकी जे जास्त असतील तेवढ्याच अधिकारी/कर्मचारी यांच्या उपस्थितीत सुरु राहतील.
▪क) पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रासाठी निर्गमित केलेल्या दिनांक १४.०४.२०२१ रोजीच्या आदेशातील मुद्दा क्र.२ (Essential Category) मध्ये नमूद सर्व अत्यावश्यक सेवांची कार्यालये कमीतकमी आवश्यक कर्मचारी उपस्थितीत सुरु राहतील. मात्र कोणत्याही परिस्थितीत कर्मचारी उपस्थिती ५०% पेक्षा जास्त असणार नाही. अत्यावश्यक सेवा (Essential Services) प्रत्यक्ष पुरविण्याच्या कामी किमान मनुष्यबळ वापरावे. आवश्यकतेनुसार यामध्ये १००% पर्यंत वाढ करण्यास मुभा राहील.

●२) लग्न समारंभ –

▪ लग्न समारंभ कार्यक्रम जास्तीत जास्त २५ लोकांच्या उपस्थितीत केवळ २ तासांच्या कालावधीत एकच कार्यक्रम व एकाच हॉलमध्ये साजरा करणेस परवानगी राहील. सदर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वर वधू पक्षावर रक्कम रुपये ५०,०००/- याप्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात येईल. तसेच संबंधित हॉल किंवा लग्न समारंभाचे ठिकाण यांचेकडून नियमांचा भंग झाल्यास मे.केंद्र शासन कोविड-१९ आपत्ती संपूर्णपणे संपली असे घोषित करेल त्या दिवसापर्यंत संबंधित आस्थापना बंद करण्यात येतील.

●३) खाजगी प्रवासी वाहतूक –

▪खाजगी बस वगळता इतर खाजगी प्रवासी वाहतूक आपत्कालीन व अत्यावश्यक कारणासाठी किंवा इकडील दिनांक १४.०४.२०२१ रोजीच्या आदेशात नमूद केलेनुसार वैध कारणांसाठी आसन क्षमतेच्या ५०% क्षमतेने सुरु राहतील. सदर संबंधित वाहन चालक मालक हे ज्या ठिकाणी राहतात तेथेच वाहतूक करणे अपेक्षित आहे. यामध्ये आंतर जिल्हा किंवा एका शहरातून दुसऱ्या शहरात प्रवासी वाहतूक करणे अपेक्षित नाही.
▪आंतर जिल्हा किंवा एका शहरातून दुसऱ्या शहरात प्रवास करण्यास खालील वैध कारणांसाठीच परवानगी राहील. याव्यतिरिक्त इतर कारणास प्रवास करणेस संपूर्णतः प्रतिबंध राहील. १) इकडील दिनांक १४.०४.२०११ रोजीच्या आदेशात नमूद अत्यावश्यक सेवा (Essential Service)२) वैद्यकीय आपत्कालीन प्रसंग असल्यास३) अंत्यसंस्कार४) कुटुंबातील व्यक्तींना गंभीर स्वरूपाचा आजार असल्यास सदर नियमांचा भंग करणाऱ्या व्यक्तीवर रक्कम रुपये १०,०००/- याप्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात येईल.

वाचा- जम्बो कोविड सेंटरमधील रुग्णांना वेळेत योग्य उपचार व आरोग्य सुविधा द्या – सचिन चिखले

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button