ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘गृहमंत्री पद फेकून देण्याची शक्ती दिलीप वळसे पाटलांना भिमा भगवान देवो’

चंद्रपूर | राज्यातील विशेष पोलीस महानिरीक्षक, उपमहानिरीक्षक तथा अधिक्षक दर्जाचा ३७ अधिकाऱ्यांच्या बुधवारी बढत्या आणि बदल्या करण्यात आल्या. यावर आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. दिलीप वळसे पाटील यांच्या मतदार संघात भिमा ज्योर्तिलिंग देवस्थान आहे. गृहमंत्री म्हणून त्यांच्यावर दबाव असेल तर गृहमंत्री पद फेकून देण्याची शक्ती दिलीप वळसे पाटलांना भिमा भगवान देवो, अशी मी प्रार्थना करतोय, असा खोचक टोला मुनगंटीवारांनी लगावला.

चंद्रपूरात भाजपा तर्फे जन आक्रोश आंदोलन आज करण्यात आले. आंदोलनादरम्यान मुनगंटीवारांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. बदल्या करताना पसंती, नापसंती हा प्रश्नच उपस्थित होत नाही. नियमाच्या चौकटीत सूप्रीम कोर्टाने पोलीस विभागाचा बदल्या कश्या कराव्या, यासाठी काही निर्देश दिले आहेत. या निर्देशानुसार बदल्या करण्याचा अधिकार पोलीस महासंचालकाचा आहे. हा एकनाथ शिंदेचा अधिकार नाही, असा घणाघातही मुनगंटीवारांनी लावला.

३७ अधिकाऱ्यांच्या बढत्या आणि बदल्या

दरम्यान, राज्यातील विशेष पोलीस महानिरीक्षक, उपमहानिरीक्षक आणि अधीक्षक दर्जाच्या ३७ अधिकाऱ्यांच्या बुधवारी बढत्या आणि बदल्या करण्यात आल्या. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे सहआयुक्त म्हणून सुहास वारके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या आर्थिक गुन्हे शाखेची जबाबदारी उत्तर मुंबईचे अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रवीण पडवळ यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. पश्चिम विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त संदीप कर्णिक हे पुण्याचे सहआयुक्त बनले असून चर्चेत असलेले नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांची बदली करून जयंत नाईकनवरे यांना नाशिकच्या आयुक्तपदाची धुरा देण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button