breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#CoronaVirus: कोरोनातून बरं झाल्यानंतर नगरसेवकांनं काढली कंटेनमेंट झोनमधून रॅली; पोलिसांनी केलं अटक

देशात करोनामुळे सात हजारांहून लोकांना करोनामुळे जीव गमवावा लागला आहे. मात्र, करोनाविषयीचं गांभीर्य लोकं विसरायला लागले असल्याचं दिसून येऊ लागलं आहे. बंगळुरूमध्येही अशीच एक घटना घडली आहे. करोनावर मात करून बाहेर पडलेल्या नगरसेवकानं चक्क रॅलीच काढली. चिंतेची बाब म्हणजे चक्क कंटेनमेंट झोन मधील रस्त्यावरून ही रॅली काढण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी नगरसेवकाला अटक केली आहे.

बंगळुरूतील पदरायनपुरा वार्डाचे नगरसेवक इम्रान पाशा यांना करोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर व्हिक्टोरिया रुग्णालयात उपचार करण्यात आले. उपचारानंतर करोनातून बरं झालेल्या पाशा यांची रुग्णालयातून घरातपर्यंत रॅली काढण्यात आली. रविवारी दुपारी रुग्णालयातून डिस्चार्च मिळालेल्या पाशा यांचं फुलांचा वर्षाव व फटाके फोडून स्वागत करण्यात आलं. मर्सिडिज कारमधून त्यांची रॅली काढण्यात आली. विशेष म्हणजे कंटेनमेंट झोनमधून ही रॅली काढण्यात आली. यावेळी म्हैसूर रोडवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती.

रॅलीची माहिती मिळताच बंगळुरू पोलिसांनी पाशा यांच्या घरी धाव घेतली. आपत्ती व्यवस्थापन कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी पाशा यांच्यावर गुन्हा दाखल करत त्यांना ताब्यात घेतलं. पोलिसांच्या कारवाईनंतर बंगळुरूचे पोलीस आयुक्त भास्कर राव यांनी परिसराला भेट दिली व पदरायणपुरा परिसरात पाच दिवसांसाठी निर्बंध लागू केले. त्याचबरोबर राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्याही परिसरात तैनात करण्यात आल्या आहेत. “पोलिसांनी इम्रान पाशा याना आपत्ती व्यवस्थापन कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे,” अशी माहिती पोलीस आयुक्त राव यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button