breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्र

MAVITARAN SHIRALA : अवकाळी पावसातही वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी लढणारे जनमित्र ‘रिअल हिरो’

अवकाळी पावसामुळे ठिकठिकाणी वीज पुरवठा विस्कळीत

उपकार्यकरी अभियंता पी. एम. बुचडे यांची ‘टीम’ मध्यरात्रीही सतर्क

शिराळा| महाईन्यूज | प्रतिनिधी
देशात कोरोनाची दहशत आणि आता अवकाळी पावसाने सर्वसामान्य नागरिकांना हैराण केले आहे. अत्यावश्यक सेवा असलेली वीज पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे महावितरण अधिकारी आणि कर्मचारी टिकेचे लक्ष्य होत आहेत. मात्र, शिराळा उपविभागीय महावितरण प्रशासनाअंतर्गत काम करणारे जनमित्र आणि अधिकारी मध्यरात्रीही वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी फिल्डवर काम करीत आहेत. जीव धोक्यात घालून काम करणारे वीज कर्मचारी ‘रिअल हिरो’ ठरले आहेत.
शिराळा परिसरात मंगळवारी आणि बुधवारी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. वादळी वाऱ्यामुळे महावितरण कंपनीचे पोल कोलमडले आहेत. त्यामुळे शिराळा शहर परिसर, एमआयडीसी, कणदूर सबस्टेशन, मांगले शाखा आदी भागातील वीज पुरवठा खंडित झाला. आगोदरच कोरोनाच्या दहशतीमुळे भयभीत झालेले नागरिक खंडित वीजपुरवठयामुळे हैराण झाले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन शिराळा उपविभागाचे उपकार्यकरी अभियंता पी. एम. बुचडे यांनी आपल्या सर्व ‘टीम’ला सूचना दिल्या.
मध्यरात्री उशिरा शाखा शिराळा एकचे अभियंता रुपेश कोरे, शाखा दोनचे अभियंता बारपत्रे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी लाईनवर उपस्थित राहून वीज पुरवठा पूर्ववत केला. तसेच, कणदूर सबस्टेशनमधील शाखा सगांवचे अभियंता जगताप, मांगले शाखा अभियंता एस. गोंडील आणि सहकारी यांनीही त्यांच्या विभागातील वीज पुरवठा सुरळीत केला. याकामी ‘जाबाज जनमित्र’ यांनी आपला जीव धोक्यात घालून मध्यरात्रीही अचूक नियोजन केले.
****
परिसरातील नागरिकांकडून जनमित्रांचे कौतुक…
एकीकडे कोरोना विषाणूने थैमान घातले असताना व अवकाळी पावसाचे अस्मानी संकटास तोंड देत असताना वीज पुरवठा अखंडित सुरू ठेवण्यासाठी धडपड करणारे जनमित्र समाजातील ‘रिअल हिरो’ ठरले आहेत, अशा भावना नागरिक व्यक्त करीत आहेत. वीज कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देणारे उपकार्यकरी अभियंता पी. एम. बुचडे यांच्या कामाचेही शिराळा उपविभागातील नागरिकांकडून कौतुक होत आहे. नागरिकांनी घरी बसून शासनास सहकार्य करावे व सर्व जनमित्र यांनी योग्य काळजी घ्यावी मास्क व सॅनिटाईझरचा वापर करावा हात स्वच्छ धुवावेत. तसेच, ग्राहकांना अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी आम्ही सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहोत, अशी माहिती श्री. बुचडे यांनी दिली.
****
महावितरणचे ‘सोशल’ आवाहन…
कोरोनाबाबत जनजागृती करणेबाबत महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी सोशल मीडियावर आवाहन केले आहे. त्यांचा ‘मॅसेज’ चांगलाच व्हायरल होत आहे. तो पुढीलप्रमाणे

तुमचा मोबाईल चार्ज करण्याचासाठीची वीज पुरवण्याची जबाबदारी आमची….
तुम्हाला घरात गर्मी होऊ नये म्हणून पंखा सुरू ठेवण्याची जबाबदारी आमची…
तुम्हाला टीव्हीवर संपूर्ण बातम्या दाखविण्यासाठीची वीज पुरवण्याची जवाबदारी आमची…
तुम्हाला अंधारातून प्रकाश देण्याची जबाबदारी आमची…..

तुम्ही आमच्या सर्वांसाठी फक्त एकच करा.
घरात थांबा आणि कर्फ्यु पाळा.

Let’s fight together with corona.

आम्ही तुम्हाला सर्व सेवा अखंडित देऊ!
पण, कृपा करून तुम्ही घरी थांबा.
_*महावितरण*_
🙏🏻 सदैव आपल्या सेवेत 🙏🏻

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button