breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

नागरिकांना मारहाण करून पिंपरी चिंचवड पोलिसांचे व्हिडिओ स्वतःच्या टिकटॉकवर

पुणे- कोरोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी राज्य शासन आवश्यक ती सर्व पावले उचलत आहे. गर्दी रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल राज्यात संचारबंदी लागू केल्याची घोषणा केली. संचारबंदी दरम्यान विनाकारण रस्त्यावर फिरण्यांना पोलिस चोप देत आहेत. मात्र पोलिस कर्मचारी नागरिकांना मारहाण करून त्याचे व्हिडिओ स्वतःच्या टिकटॉकवर टाकताना दिसून येत आहे.

पिंपरी चिंचवड येथील पोलिस कर्मचारी नंदकुमार कदम यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत ते संचारबंदी दरम्यान रस्त्यावर फिरणाऱ्या एका व्यक्तीला चोप देताना दिसत आहेत. विशेष म्हणजे त्यांनी हा व्हिडिओ स्वतःच्या टिकटॉकवर अपलोड केला आहे. कारवाई दरम्यान फटके देणे ठीक आहे, पण मारतानाचा व्हिडीओ व्हायरल करणे चुकीचे असल्याचे काहींचे मत आहे. सदरील व्यक्ती हा कामगार वाटत असून तो बाहेर पडला म्हणजे गुन्हेगार ठरत नसल्याचे मत अनेकजणव्यक्त करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button